नाकाबंदीसाठी लावलेल्या बॅरिकेड्समुळे दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : नाकाबंदीसाठी लावलेल्या बॅरिकेड्सने पाहून रात्रीच्या वेळी अचानक ब्रेक लावल्याने दुचाकीसह घसरून रस्त्यावर पडल्यामुळे गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात मध्यरात्री 12:45 वाजता मृत्यू झाला. ही घटना शासकीय दूध डेरी चौकात रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. (आकाश बाबुराव सोनवणे वय 25 रा. भारतनगर, गारखेडा) परिसत असे मृताचे नाव आहे.

अपघात स्थळाजवळचे सीसीटीव्ही बंद असल्याने आकाश यांच्या मृत्यूचे कारण समोर येऊ शकले नाही. याविषयी प्राप्त माहिती अशी की, भारतनगरमध्ये राहणारा आकाश वर्षभरापुर्वी शेंद्रा एमआयडीसी परिसर राहण्यासाठी गेला होता. डीजे असलेला आकाश मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास महावीर चौकातून मोटारसायकलने घरी जात असताना शासकीय दूध डेरी चौकात नाकाबंदी करण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावल्याचे त्याला दिसता असताना अचानक ब्रेक लावला. यामुळे वेगाने असलेल्या दुचाकीसह घसरून रस्त्यावर पडला आणि गंभीर जखमी झाला.

या अपघातानंतर तेथील पोलिसांनी तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले. तिथे उपचार दरम्यान रात्री पाहून वाजेच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. या अपघाताची क्रांती चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली. क्रांती चौक ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणपत दराडे यांनी सांगितले की, अपघात झालेल्या चौकात एकूण चार सीसीटीव्ही कॅमेरे असून त्यापैकी एक बंद आहे.

Leave a Comment