हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी आल्यानंतर राज्य सरकारने राज्यातील 25 जिल्ह्यामध्ये निर्बंधात शिथिलता आणली आहे तर जिथे कोरोना रुग्णसंख्या कायम आहे त्या 11 जिल्ह्यांमध्ये मात्र निर्बंध कायम ठेवण्यात आले आहे. परंतु राज्यातील मंदिरे उघडण्यास मात्र सरकारने अद्याप हिरवा झेंडा दाखवलेला नाही यावरून भाजपचे अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. मंदिरं उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो अशी टीका त्यांनी केली आहे.
सगळं खुल केलं मग मंदिर का बंद?, असा सवाल करत लसीकरण झालेल्या भाविकांसाठी मंदिरं खुली करा, अशी मागणी भाजप अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी राज्य शासनाकडे केली आहे.मंदिर उघडण्याचा निर्णय घेताना ठाकरे सरकारच्या हाताला लकवा भरतो. मात्र आता सगळं काही सुरु झालेलं असताना, शासनाने नियमांमध्ये शिथीलता दिलेली असताना मंदिरं उघडण्याचा निर्णय देतीख सरकारने घ्यावा, अशी मागणी तुषार भोसले यांनी केली आहे.
हिंदू धर्मातील पवित्र श्रावण महिना सुरु होतोय. श्रावण महिन्याच्या पहिल्या दिवशी मंदिर खुली करा आणि भाविकांना दर्शन घेऊ द्या, असं तुषार भोसले यांनी म्हटलंय. मंदिरं सुरू ठेवायला सरकारला काय अडचण आहे?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.