हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आधार कार्ड (Aadhaar Card Rules) अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र ठरते. मोबाईल सिम खरेदी करायचे असो किंवा एखादे सरकारी कामकाज करायचे असो आधार कार्ड आपल्याला प्रत्येक ठिकाणीच उपयोगी पडते. परंतु आता याच आधार कार्ड संदर्भात लवकरच एक मोठा निर्णय घेतला जाणार आहे. या निर्णयामुळे आधार कार्ड धारकांना त्याचा वापर जन्मतारखेचा पुरावा म्हणून करता येणार नाही. म्हणजे ओळखपत्र अशीच आधार कार्डची ओळख राहील. हे आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा म्हणून वापरले जाणार नाही.
आधार कार्डविषयी महत्वाचे नियम (Aadhaar Card Rules)
समोर आलेल्या माहितीनुसार, बदलत्या टेक्नॉलॉजीमुळे आधार कार्ड बायोमेट्रिक लिंक केलेला ओळख पुरावा म्हणून काम करते. आधार कार्ड पॅनकार्ड, पीएफ, बँक आणि इतर अनेक गोष्टींचा जोडण्यात आले आहे. यामुळे आधार कार्ड संबंधित अनेक गैरव्यवहार होण्यास देखील सुरुवात झाली आहे. मुख्य म्हणजे, हेच आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा म्हणून वापरण्यात येत आहे. त्यामुळे आधार कार्डवरील जन्म तारीख हीच गृहीत जन्मतारीख धरली जाते. परंतु UIDAI ने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, आधार कार्डला जन्मतारखेचा पुरावा म्हणून सादर करण्यात येणार नाही.
इथून पुढे आधार कार्डचा (Aadhaar Card Rules) वापर एखाद्या व्यक्तीची ओळख स्पष्ट करण्यासाठी केला जाऊ शकतो. परंतु आधार कार्डचा वापर जन्मतारखेचा पुरावा म्हणून करता येणार नाही. या नवीन नियमानुसार, जन्मतारखेचा पुरावा म्हणून जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला कागदपत्रांच्या पडताळणीसाठी वापरला जाऊ शकतो. यामुळे व्यक्तीचे अचूक वय देखील जाणून घेता येईल. तर, आधार कार्डऐवजी एखाद्या व्यक्तीचे वय जाणून घेण्यासाठी पासपोर्ट किंवा ड्रायव्हिंग लायसन्स वापरले जाईल.
दरम्यान, EPFO सारख्या इतर काही संस्थांनी जन्मदाखलेचा पुरावा म्हणून आधार कार्ड (Aadhaar Card Rules) वापरणे रद्द केले आहे. कारण आधार कार्ड सुमारे 59 पॅन कार्डशी जोडले गेले आहे. तसेच कोणतेही सरकारी कामकाज करण्यासाठी किंवा शाळेत कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी महत्वाचे कागदपत्र म्हणून आधार कार्ड मागितले जाते. अशा अनेक कारणांमुळे आधार कार्डविषयीची सुरक्षता कमी होत चालली आहे.