Aadhaar Card Loan: आता Aadhaar Card वरतीही मिळणार कर्ज ; जाणून घ्या सविस्तर माहिती

0
1
Aadhaar Card Loan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Aadhaar Card Loan – आधारकार्ड (Aadhaar Card) हे भारतीय नागरिकांसाठी एक महत्वाचे ओळखपत्र बनले आहे. पण याची मदत केवळ ओळख पटवून देण्यासाठीच नाही, तर आपत्कालीन परिस्थितीत पैशांची आवश्यकता असताना देखील होऊ शकते. जर तुम्हाला अचानक पैशांची गरज भासली, तर आधार कार्डच्या मदतीने तुम्ही 10,000 रुपये सहजपणे कर्ज घेऊ शकता. या कर्जामुळे लोकांना आर्थिक दिलासा मिळतो आणि उध्दभवल्या समस्येवर सहज मात करता येते . या मिळालेल्या फायद्यामुळेच लोक आधार कार्डला ATM कार्ड म्हणत आहेत. तर चला हे कर्ज कसे मिळेल याची माहिती पाहुयात.

आधार कार्डवर कर्ज (Aadhaar Card Loan)

हे कर्ज तुम्हाला नॉन-बँकिंग वित्तीय संस्था (NBFC) आणि फिनटेक प्लेटफॉर्मद्वारे उपलब्ध होऊ शकते. या कर्जाची एक महत्त्वाची वैशिष्ट्य म्हणजे, यासाठी कोणत्याही तारण किंवा हमीची आवश्यकता नाही. यामध्ये तुम्हाला त्वरित कर्ज मिळते आणि ते एकरक्कमी फेडण्याऐवजी हप्त्यात फेडता येते.

पॅनकार्ड असल्यास कर्जाची रक्कम अधिक –

आधार कार्डवरून कर्ज (Aadhaar Card Loan) मिळवण्यासाठी तुमच्याकडे फक्त आधार कार्ड आणि बँक खात असणे आवश्यक आहे. या कर्जासाठी पॅनकार्ड देखील दिल्यास कर्जाची रक्कम अधिक होऊ शकते. या प्रकारच्या कर्जासाठी कोणतेही दुसरे कागदपत्र , जसे की पगाराचा पुरावा अथवा इतर कागदपत्रांची आवश्यकता नाही.

कर्ज मिळवण्यासाठी वय –

आधार कार्डवर कर्ज मिळवण्यासाठी तुमचं वय 21 ते 60 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. यासोबतच, तुमच्याकडे एक स्थिर उत्पन्न असणे आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही नोकरदार असू शकता किंवा स्वत:चा व्यवसाय असावा लागतो. तसेच, कर्ज घेणाऱ्याचे बँकेत खाते असणे हे देखील बंधनकारक आहे.कर्ज घेण्याच्या प्रक्रियेबद्दल, तुम्हाला एनबीएफसी किंवा फिनटेक प्लेटफॉर्मच्या अधिकृत ॲप किंवा वेबसाइटवर जाऊन अर्ज करावा लागेल. यासाठी तुम्हाला केवळ आधार कार्ड आणि काही व्यक्तिमत्व प्रमाणपत्रांची आवश्यकता आहे. आधार कार्ड (Aadhaar Card Loan)वापरून तुम्ही आपत्कालीन परिस्थितीत सहजपणे कर्ज घेऊ शकता.

हे पण वाचा : Reliance चा नफा 18540 कोटींवर; शेअर्समध्ये मोठी वाढ