आता कोणत्याही कागदपत्रांशिवाय अपडेट करता येणार Aadhar Card मधील पत्ता

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्याच्या काळात Aadhar Card हे एक अत्यंत महत्त्वाचे डॉक्युमेंट बनले आहे. याच बरोबर आता आधार कार्डचा वापर अनेक महत्वाच्या कामांसाठी देखील केला जातो आहे. याशिवाय, आधार कार्ड आता रेशन कार्ड, पॅन कार्ड सारखी महत्वाची कागदपत्रे आणि खात्यांशी लिंक करणे देखील बंधनकारक झाले आहे. जर आपल्या आधारमधील अर्धवट असेल अथवा चुकीची असेल तर अनेक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. मात्र आपल्या आधार कार्डमधील माहिती अपडेट देखील करता येते. याआधी युझर्सना आधार कार्डमध्ये आपला पत्ता अपडेट करण्यामध्ये खूप अडचणी येत होत्या. यानंतर आता UIDAI कडून आधार कार्डवरील पत्ता अपडेट करण्याची प्रक्रिया सुलभ केली गेली आहे.

What Is Blue Aadhaar Card? How Can One Avail These Identity Cards | All You  Need

एका मीडिया रिपोर्ट्स नुसार, आता युझर्सना Aadhar Card मधील पत्ता अपडेट करण्यासाठी कोणतेही डॉक्युमेंट्स नसले तरी तो अपडेट करता येणार आहे. आता युझर्सना आपला पत्ता म्हणून कुटुंबप्रमुखाचा पत्ता देता येईल. UIDAI च्या नवीन प्रक्रियेनुसार कुटुंबप्रमुखाच्या मान्यतेनंतर आधारमधील पत्ता अपडेट केला जाऊ शकेल.

Aadhaar Card Update: Change address in Aadhaar in few simple steps, here's  how | Personal Finance News | Zee News

अशा प्रकारे होईल फायदा

UIDAI च्या या नवीन नियमामुळे आता मुलाचा पत्ता, पत्नीचेचा आधार अपडेट करणे सोपे झाले आहे. आता कुटुंब प्रमुखाच्या पत्त्यावरच ते अपडेट करता येणार आहे. ही सुविधा ऑनलाइन उपलब्ध होणार आहे. मात्र या प्रक्रियेस 30 दिवस लागतील. आधार कार्डावरील पत्ता बदलण्यासाठी अनेकांकडे कागदपत्रे नसतात. आता ते त्यांच्या घराच्या प्रमुखाच्या किंवा वडिलांच्या नावाने पत्ता अपडेट करू शकतात.

How to Apply for a New Aadhaar Card Online and Offline

आधार हिस्ट्री सतत तपासा

आधारमधील गैरवापराच्या घटनांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. ज्यामुळे आता Aadhar Card बाबतचा जरासाही निष्काळजीपणा अंगलट येऊ शकेल. असे होऊ नये यासाठी आपल्या आधारची हिस्ट्री ऑनलाइन तपासत रहा.

Aadhaar Card: Eligibility, Application, Documents - Complete Guide

अशा प्रकारे तपासा ऑनलाइन आधारची हिस्ट्री

सर्वांत आधी आधार कार्ड http://uidai.gov.in च्या अधिकृत वेबसाइटवर जा.
येथे My Aadhar पर्याय निवडा.
Aadhaar Services पर्यायाच्या खाली Aadhaar Authentication History लिहिलेले दिसेल, त्यावर क्लिक करा.
आता नवीन विंडो उघडेल. तुमचा 12 अंकी आधार क्रमांक येथे टाका. सिक्योरिटी कोड एंटर करा आणि send OTP वर क्लिक करा.
आता Aadhar Card ची हिस्ट्री डाउनलोड करू शकता. हिस्ट्री नीट तपासा. काही चुकीची माहिती दिसल्यास आधार केंद्रावर जा आणि ती त्वरित दुरुस्त करा.

हे पण वाचा :
Poco C50 : अवघ्या 6,499 रुपयांच्या ‘या’ स्मार्टफोनमध्ये मिळवा जबरदस्त फीचर्स
Fixed Deposits : खुशखबर !!! ‘या’ NBFC कंपनीकडून FD वर 9.36% पर्यंत व्याज मिळवण्याची संधी
Indian Bank कडून ग्राहकांना धक्का, बँकेने कर्जावरील व्याजदरात केली वाढ
Multibagger Stock : गेल्या 23 वर्षांत ‘या’ कंपनीच्या शेअर्सने गुंतवणूकदारांवर पाडला पैशांचा पाऊस
Money Laundering म्हणजे काय ??? याद्वारे काळा पैसा पांढरा कसा केला जातो हे समजून घ्या