हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Aadhar Card : आधारच्या सुरक्षेबाबत नुकताच वाद रंगला होता. आता या वादाच्या पार्श्वभूमीवर UIDAI ने आधारशी संबंधित फसवणूक थांबवण्यासाठी अनेक सूचना जारी केल्या आहेत. गेल्या महिन्याच्या सुरुवातीलाच UIDAI च्या बेंगळुरू विभागाकडून लोकांना आधार क्रमांक शेअर करण्याबाबत एक इशारा देण्यात आलेला होता.
यापूर्वी देखील Aadhar Card च्या सुरक्षेवरून अनेकदा वाद निर्माण झाले आहेत. भारतात आजकाल आधारबाबतची फसवणूक खूप सामान्य झाली आहे. UIDAI ने अनेकदा ट्वीट्सच्या माध्यमातून आधार कार्डशी संबंधित फसवणूक टाळण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. चला तर मग त्याविषयी जाणून घेउयात…
Aadhar Card व्हेरिफाय करा- UIDAI ने एका ट्विटमध्ये सांगितले की सर्व 12-अंक हे आधार क्रमांक नाहीत. त्यामुळे ओळखीचा पुरावा म्हणून ते वापरण्यापूर्वी कोणत्याही व्यक्तीने तो पोर्टलद्वारे व्हेरिफाय करायला हवा.
मास्क्ड आधार वापरा- UIDAI ने मास्क्ड आधार वापरण्यास प्रोत्साहन दिले आहे. मास्क्ड आधार कार्ड मध्ये फक्त शेवटचे चारच अंक दिसतात. हे व्हॅलिड असेल.
सार्वजनिक ठिकाणच्या कॉम्प्युटर्सवर Aadhar Card डाउनलोड करणे टाळा- UIDAI ने युझर्सना सार्वजनिक ठिकाणच्या कॉम्प्युटर्सवर ई-आधार डाउनलोड करू नये आणि जर केले असेल तर सर्व कॉपी डिलीट करण्यास सांगितले आहे.
आधार ऑथेंफिकेशन हिस्ट्री तपासा- UIDAI ने म्हटले आहे की,” गेल्या 6 महिन्यांतील आधारच्या 50 ऑथेंफिकेशन हिस्ट्री पहा. यामध्ये ऑथेंफिकेशनची अचूक तारीख आणि वेळ दाखवली जाईल.
आधार OTP शेअर करू नका- Aadhar Card ची फसवणूक टाळण्यासाठी UIDAI ने नागरिकांना आधार OTP कोणासोबतही शेअर न करण्यास सांगितले आहे.
फक्त अधिकृत पोर्टलवरून आधार डाउनलोड करा- UIDAI ने युझर्सना फक्त अधिकृत वेबसाइटवरूनच आधार डाउनलोड करण्यास सांगितले आहे.
आधार लॉक करा- UIDAI ने आधार युझर्सना mAahdaar App वापरून Aadhar Card बायोमेट्रिक्स लॉक करण्यास सांगितले आहे. तसेच यासाठी अधिकृत वेबसाइटही वापरता येईल.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://uidai.gov.in/
हे पण वाचा :
e-PAN Card : आता अवघ्या काही मिनिटांत डाउनलोड करता येईल e-PAN Card, त्यासाठीची प्रक्रिया जाणून घ्या
RBI : आता चलनी नोटांवर दिसणार नाही महात्मा गांधींचा फोटो ??? RBI ने म्हंटले कि…
Kapil Dev : ”जेव्हा धावांची गरज असते तेव्हा ते बाद होतात”, रोहित-कोहलीवर भडकले कपिल देव !!!