हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Aadhar Card Linking) आपले आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांशी लिंक असणे अनिवार्य आहे याबाबत आपण सारेच जाणतो. असे असूनही अनेक लोकांनी अद्याप पॅन कार्ड आधारसोबत लिंक केलेले नाही. जर तुम्हीदेखील या लोकांपैकी एक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सरकारने तुम्हाला पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी शेवटची संधी दिली आहे. येत्या ३१ मे पर्यंत तुम्हाला पॅन- आधार लिंक करायचे आहे. मात्र तुम्ही ही संधी सुद्धा सोडलात तर मात्र तुमचं अवघड होणार आहे.
अंतिम संधी
प्राप्तिकर विभागाने ३० जून २०२३ पर्यंत पॅन कार्ड आधार कार्डसोबत लिंक करू न शकणाऱ्यांवर दंड आकारण्याची अंतिम मुदत शिथिल केली आहे. (Aadhar Card Linking) दरम्यान आयकर विभागाने सांगितल्यानुसार, ३१ मे २०२४ पर्यंत करनिर्धारकाने पॅन आणि आधार लिंक केल्यास TDS बाबत कोणतीही कारवाई केली जाणार नाही. नियमांनुसार, करदात्याला त्याचे पॅन आधार क्रमांकाशी लिंक करणे बंधनकारक आहे. त्यामुळे जर का हे दोन्ही महत्वाचे दस्तावेज एकमेकांसोबत लिंक नसतील तर मात्र लागू दराच्या दुप्पट दराने TDS कापला जाईल याची नोंद घ्यावी.
PAN- आधार लिंक केले नाही तर काय होईल? (Aadhar Card Linking)
सरकारतर्फे वारंवार पॅन- आधार लिंक करण्याबाबत सूचना देऊनही अनेक लोकांनी त्याकडे सोयीने दुर्लक्ष केल्याचे दिसून आले आहे. आता अशा लोकांसाठी शेवटची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे. अशावेळी या संधीकडे देखील पाठ फिरवली तर मात्र कारवाई होणे निश्चित आहे. येत्या ३१ मे पर्यंत जर पॅन- आधार लिंक केले नाही तर तुमचा पॅन निष्क्रिय केला जाणार आहे.
अर्थात तुमचा पॅन यापुढे कर संबंधित कारणांसाठी वैध राहणार नाही. तसेच तुमचा पॅन निष्क्रिय झाल्यास, त्यावर प्रलंबित कर परतावा आणि त्यावरील व्याज जारी केले जाणार नाही. तसेच जास्त दराने TDS कट केला जाईल. (Aadhar Card Linking) अर्थात तुमचा पॅन- आधार लिंक नसल्याने व्यवहार करताना लागू होणाऱ्या दराच्या दुप्पट दराने TDS द्यावा लागेल.
पॅन- आधार कसे लिंक कराल?
पॅन- आधार लिंक करणे अगदी सोप्पे आहे. तुम्ही ऑनलाईन स्वरूपात स्वतःच लॅपटॉप वा कॉम्प्युटरच्या सहाय्याने पॅन- आधार लिंक करू शकता. यासाठी तुम्हाला खालील पायऱ्यांचा वापर करावा लागेल.
- इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. (Aadhar Card Linking)
- यानंतर ‘क्विक लिंक्स’ विभागात जाऊन ‘लिंक आधार’ पर्यायावर क्लिक करा.
- आता तुमचा पॅन आणि आधार क्रमांक एंटर करा.
- त्यानंतर ‘व्हॅलिडेट’ बटणावर क्लिक करा.
- तुमच्या आधार कार्डवर असलेले तुमचे नाव आणि मोबाईल नंबर टाका.
- पुढे ‘Link Aadhaar’ या बटणावर क्लिक करा.
- यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल तो एंटर करा.
- शेवटी ‘Validate’ बटणावर क्लिक करा.