AAI Recruitment 2024 | भारतीय विमानतळ प्राधिकरणामध्ये नोकरीची मोठी संधी, तब्बल 490 पदांसाठी भरती सुरु

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

AAI Recruitment 2024 | सरकारी नोकरीची एक नवीन संधी आम्ही तुमच्यापर्यंत आज घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे आता भारतीय विमानतळ प्राधिकरणाने (AAI I विविध शाखांमध्ये तब्बल 490 कनिष्ठ कार्यकारी पदांसाठी रिक्त जागा काढलेल्या आहेत. आणि या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना देखील जाहीर करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता जे इच्छुकांनी पात्र उमेदवार आहेत. त्यांनी लवकरात लवकर अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करायचे आहे. अर्ज तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहेत. त्यामुळे वेळ वाया न घालवता तुम्ही लवकरात लवकर हे अर्ज करावेत.

यामध्ये 490 जुनियर एक्झिक्यूटिव्ह साठी रिक्त जागा भरण्यासाठी ही भरती काढण्यात आलेली आहे. GATE 2024 मध्ये संबंधित विषयात अभियांत्रिकी पदवी किंवा MCA झालेल्या उमेदवारांचा विचार केला जाणार आहे. त्यामुळे जर तुमच्या शिक्षण इंजीनियरिंग किंवा एमसीए झाले असेल तर तुम्ही या पदासाठी नक्कीच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता

महत्वाच्या तारखा

ही अर्ज प्रक्रिया 2 एप्रिल 2024 रोजी सुरू होणार आहे. त्याचप्रमाणे 1 मे 2024 ही अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख असणार आहे. त्यामुळे तुम्हाला अर्ज करण्यासाठी तब्बल एक महिना मिळत आहे. म्हणून जे कोणी विद्यार्थी पात्र आहे तसेच इच्छुक आहेत त्यांनी या एका महिन्यात लवकरात लवकर अर्ज करावा.

वयोमर्यादा | AAI Recruitment 2024

अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय हे कमीत कमी 27 असणे गरजेचे आहे. त्याचप्रमाने ST आणि SC साठी वर्ष आणि ओबीसी उमेदवारांसाठी तीन वर्ष सूट देण्यात आलेली आहे

रिक्त पदे

  • कनिष्ठ कार्यकारी (आर्किटेक्चर)- 3
  • कनिष्ठ कार्यकारी (अभियांत्रिकी-सिव्हिल)- 90
  • कनिष्ठ कार्यकारी (अभियांत्रिकी-इलेक्ट्रिकल)- 106
  • कनिष्ठ कार्यकारी (इलेक्ट्रॉनिक्स)- 278
  • कनिष्ठ कार्यकारी (माहिती तंत्रज्ञान) – 13

अर्ज शुल्क

अर्जाची शुल्क हे 300 रुपये आहे. त्याचप्रमाणे एससी एसटी पीडब्ल्यूडी उमेदवारी यांना (AAI ) मध्ये एक वर्षाच्या शिकाऊ प्रशिक्षण दिले जाते आणि महिला उमेदवारांना देखील ही पासून संपूर्ण सवलत दिलेली आहे.