Thursday, March 30, 2023

तीनशे पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करताना भारताला रोहित शर्माची गरज – आकाश चोप्रा

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दोन्ही एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाचा दारुण पराभव झाला. दोन्ही सामन्यात ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीची पिसे काढतात तब्बल 370 पेक्षा जास्त धावा काढल्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय फलंदाज अयशस्वी ठरले. विराट कोहली, शिखर धवन, हार्दिक पांड्या, लोकेश राहुल यांचा अपवाद वगळता भारतीय फलंदाज अयशस्वी ठरले. माजी कसोटीपटू आकाश चोप्राच्या मते तीनशे पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करताना भारताला रोहित शर्माची गरज आहे.

त्रिशतकी धावसंख्येचा पाठलाग करायचा असतो त्यावेळी तुमची सुरुवात चांगली असणं गरजेचं आहे. मधल्या षटकांमध्ये भागीदारी करुन आणि फटकेबाजी करुन काही साध्य होत नाही. पहिल्या ३ विकेट गमावल्यानंतरही तुम्ही सामना जिंकण्याची अपेक्षा करत असाल तर ते शक्य नाही. यासाठी सलामीच्या फलंदाजांपैकी दोघांनी फटकेबाजी करत शतक झळकावणं गरजेचं आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघात रोहित शर्मा असणं गरजेचं आहे. त्रिशतकी धावसंख्येचा पाठलाग करताना तो फटकेबाजी करु शकतो.” आकाश चोप्रा आपल्या यु-ट्यूब चॅनलवरील कार्यक्रमात बोलत होता.

- Advertisement -

दरम्यान, दुखापतीमुळे रोहित शर्मा भारतीय संघात सामील होऊ शकला नाही. रोहित ला वगळण्यात आले की खरंच तो दुखापतग्रस्त आहे यावरून आधी वाद सुरू होता. पण रोहित 70% फिट आहे असं बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी स्पष्ट केले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’