हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरात विधानसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला अपेक्षित असं यश मिळाले नसलं तरी या निवडणुकीमुळे आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणार आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत आप ला 13 % मते मिळाली आहेत. राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी जे काही निकष असतात त्या सर्वात आम आदमी पक्ष पात्र ठरला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी 2013 मध्ये आम आदमी पक्षाची स्थापना केली. त्यावेळी दिल्लीत झालेल्या निवडणुकीत 28 जागा जिंकून पक्षाने ओळख मिळवली. यानंतर आपने दिल्लीत एकहाती सत्ता स्थापन केली. दिल्लीनंतर आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये सत्ता काबीज केली. याशिवाय गोव्यातही त्यांचे 2 आमदार आहेत. आत्ताच्या गुजरात निवडणुकीतही आपचे 5 उमेदवार आघाडीवर आहेत. गुजरातच्या जनतेने 13% मते आम आदमी पक्षाच्या पारड्यात टाकली आहेत. त्यामुळे गुजरातमध्ये जरी सत्ता मिळवता आली नसली तरी आम आदमी पक्ष या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रीय पक्ष म्हणून उदयास आला आहे.
गुजरातमध्ये भाजपच दादा; काँग्रेस -आपचा सुफडा साफ
वाचा सविस्तर-👉🏽 https://t.co/3esCCmpa3n#Hellomaharashtra @BJP4Maharashtra
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) December 8, 2022
राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी काय निकष आहेत?
लोकसभेच्या एकूण जागांच्या किमान 2 टक्के जागा 3 राज्यांमधून. म्हणजेच लोकसभेत 3 राज्यांमधून किमान 11 खासदार.
लोकसभेत किमान 4 खासदार. सोबतच 4 राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकांमध्ये किमान 6 टक्के मत.
किमान 4 राज्यांमध्ये संबंधित पक्षाला राज्य पक्षाचा दर्जा.
देशात सध्या किती राष्ट्रीय पक्ष आहेत?
देशात सध्या 7 राष्ट्रीय पक्ष आहेत. यामध्ये भाजप, काँग्रेस, बसपा, एनपीपी, सीपीआय, एनसीपी आणि टीएमसी या पक्षांचा समावेश आहे.