AAP-Congress Alliance : काँग्रेस- आप युतीची घोषणा!! पहा कोण किती जागा लढणार?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

AAP-Congress Alliance : २०२४ च्या लोकसभा निवडणुकांच्या हालचालींना वेग आला आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने युतीची घोषणा केली आहे. भाजपविरोधी इंडिया आघाडीतील या दोन्ही पक्षांनी दिल्ली, गुजरात, हरयाणा आणि गोवा अशा चार राज्यांमध्ये युतीची घोषणा केली आहे तसेच जागावाटप सुद्धा जाहीर केलं आहे. त्यामुळे काँग्रेसच्या हाताला आम आदमीच्या झाडूची साथ मिळाली आहे.

कोण किती जागा लढवणार? AAP-Congress Alliance

भाजपला हरवण्यासाठी दिल्ली आणि पंजाबमध्ये सत्तेत असलेल्या आम आदमी पक्षासोबत आघाडी करण्याचे प्रयत्न काँग्रेसकडून सुरू होते. अखेर दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला आहे. काँग्रेसचे सरचिटणीस आणि खासदार मुकुल वासनिक यांनी याबाबत माहिती देत म्हंटल की, दिल्ली लोकसभेच्या एकूण सात जागा आहेत. यापैकी आम आदमी पक्ष चार जागांवर निवडणूक लढवणार आहे. यामध्ये नवी दिल्ली, पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली आणि पूर्व दिल्लीचा समावेश आहे. तर काँग्रेस तीन जागांवर निवडणूक लढवणार असून यामध्ये चांदणी चौक, ईशान्य आणि वायव्य भागाचा समावेश असेल.

यानंतर गुजरातमध्ये काँग्रेस लोकसभेच्या २४ जागा लढवेल. तर भरुच आणि भावनगर मतदारसंघात आपचे उमेदवार असतील. हरयाणात लोकसभेच्या एकूण १० जागा आहेत. त्यातील ९ जागा काँग्रेस, तर १ जागा आप लढवणार आहे. गोव्यात लोकसभेच्या केवळ २ जागा आहेत. या दोन्ही जागा काँग्रेस लढवणार असल्याचं (AAP-Congress Alliance) मुकुल वासनिक यांनी सांगितलं. मात्र, पंजाब आणि चंदीगडमध्ये आम आदमी पक्ष आणि काँग्रेसमध्ये युती नाही. दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. चंदीगडची जागा काँग्रेसकडे गेली आहे. हरियाणात काँग्रेस नऊ जागांवर तर आप एका जागेवर लढणार आहे.