तेजश्रीच्या बर्थडेसाठी आशुतोषची खास पोस्ट; मित्र म्हणून दिला ‘हा’ सल्ला

0
36
Tejshree_Aashutosh
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। तेजश्री प्रधानचा काल ३३वा वाढदिवस होता. कधी जान्हवी तर कधी शुभ्रा म्हणून तिने प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिच्या स्माईलवर तर लाखो लोक फिदा आहेत. तिने खूपच कमी काळात मराठी इंडस्ट्रीत तिची एक ओळख निर्माण केली आहे. तिचा स्वतःचा असा मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर तिची जबरदस्त फॅन फॉलोव्हिंग असून तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यावर तिचे चाहते भरभरून प्रेम करतात. तेजश्रीने अलीकडेच अगंबाई सासूबाई हि मराठी मालिका गाजवली होती. यातील शुभ्रा पात्र लोकांना इतके आवडले होते कि लोक आजही तिची आठवण काढतात. या मालिकेत तिच्या ऑपोजिट सोहमचे पात्र साकारणारा आशुतोष पत्की याच्यासोबत तिची चांगली गट्टी जमली आहे. तिच्या याच मित्राने तिचा वाढदिवस म्हणून एक खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. इतकेच नव्हे तर या पोस्टमध्ये त्याने तेजश्रीला मोलाचा सल्लाही दिला आहे.

https://www.instagram.com/p/CPmo3feJv85/?utm_source=ig_web_copy_link

 

आशुतोषने सोशल मीडियावर त्या दोघांचा एक फोटो पोस्ट करून त्यासोबत लिहिले आहे की, माझी प्रिय मैत्रीण तू माझ्यासाठी खूपच खास आहेस… मला मार्गदर्शन केल्याबद्दल आणि नेहमीच माझ्या पाठिशी उभी राहिल्याबद्दल धन्यवाद…. मी तुला तुझ्या वाढदिवसाला दोन टिप्स देऊ इच्छितो पहिली म्हणजे तुझा भूतकाळ विसरून जा… कारण तू तो बदलू शकत नाही आणि दुसरी म्हणजे वर्तमानकाळ देखील विसरून जा… कारण तुझ्यासारखी कोणीच नाहीये… यावर तेजश्रीनेही त्याला कमेंट करीत शुभेच्छांसाठी धन्यवाद म्हटले आहे तर वर्तमान विसरणार नाही असेही म्हटले आहे. अभिनेता आशुतोष पत्की हा ज्येष्ठ व प्रसिद्ध गीतकार अशोक पत्की यांचा मुलगा आहे. अगंबाई सासूबाई हि त्याची पहिलीच मालिका असून त्याने अत्यंत सुंदररित्या आपल्या भूमिकेची मांडणी केली होती.

https://www.instagram.com/p/CJFtu9Sl7e2/?utm_source=ig_web_copy_link

तेजश्री प्रधानने आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे. विविध मालिका, नाटके आणि अगदी चित्रपटात सुद्धा तिने काम केले आहे. यांतील तिच्या भूमिका रसिकांना भावल्या आहेत. छोटा पडदा आणि मोठ्या पडद्यानंतर हिंदी तसंच मराठी रंगभूमीवरही तेजश्रीने वेगळी छाप पाडली आहे.

https://www.instagram.com/p/B83lx-7lK0f/?utm_source=ig_web_copy_link

हिंदी असो किंवा मराठी नाट्य रसिक तेजश्रीच्या अभिनयावर सारेच फिदा आहेत. झी मराठीवरील होणार सून मी या घरची या मालिकेतून तेजश्री जान्हवी म्हणून काहीही हा श्री म्हणत अगदी महाराष्ट्रातील घराघरात पोहोचली. इतकंच नव्हे तर ती महाराष्ट्राची लाडकी आणि आदर्श सूनसुद्धा बनली. या मालिकेआधी तिने झेंडा या चित्रपटात सहाय्यक भूमिका केली होती. पण तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता या मालिकेने मिळवून दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here