माझ्या पक्षातील नेत्यांनी माझ्याविरोधात कट रचला; अब्दुल सत्तारांचा मोठा गौप्यस्फोट

0
289
Abdul Sattar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाविकास आघाडीमधील काही नेत्यांकडून शिंदे गटातील अनेक नेत्यांना टार्गेट केलं जात आहे. नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात शिंदे गटाचे नेते व कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात अनेक गंभीर आरोप करण्यात आले. त्यानंतर आता मंत्री सत्तार यांनी मौन सोडले असून एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझ्या पक्षातील शिंदे गटातील काही नेत्यांनी माझ्याविरोधात कट रचला आहे, असे मंत्री सत्तार यांनी म्हंटले आहे.

अब्दुल सत्तार यांनी नुकतीच एका वृत्तवाहिनाला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी गौप्यस्फोट करून एकच खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी म्हंटल आहे की, मला बदनाम करण्याचा प्रयत्न होत आहे. यात काही माझ्या पक्षातील असू शकतात तर काही माझे हितचिंतक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरात होणारी चर्चा बाहेर येत आहे. त्यामुळे आमच्यातील कोणेतरी बाहेर बातम्या पुरवत आहे. तर ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही त्यांच्याकडून हे सर्व सुरु आहे.

झालेल्या आरोपांबाबत सत्तार म्हणाले की, माझ्यावर झालेल्या सर्व आरोपाचे खुलासे मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केला आहे. मी राज्यमंत्री नसतानाही त्या काळातील आरोप माझ्यावर करण्यात आले. मला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे. माझ्या पक्षातील देखील काही व्यक्तींचा यात असू शकतात. तर विरोधी पक्षात देखील माझे अनेक हितचिंतक आहेत. माझ्यासारखा अल्पसंख्याक व्यक्ती कृषिमंत्री पदावर बसल्याने अनेकांना पाहिले जात नाही. त्यामुळे सतत माझ्याविरोधात कट कारस्थान रचले जात असल्याचा आरोप अब्दुल सत्तार यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी

यावेळी अब्दुल सत्तार म्हणाले की, सध्या आमच्या पक्षात ज्या ज्या बैठका होत आहेत. त्या बैठकीतील झालेल्या चर्चेच्या बातम्या बाहेर येत आहे. मागील काही दिवसापूर्वी आमची मुख्यमंत्री शिंदेसोबत एक बैठक झाली होती. त्या बैठकीत चर्चा अत्यंत गुप्त होती. मात्र, बैठकीत काय झाले हे नंतर बाहेर आले. विशेष म्हणजे ज्या गोष्टी घडल्या नाहीत त्या देखील बाहेर सांगण्यात आल्या. त्यामुळे आपल्यातील कुणीतरी आपल्यातील खासगी गोष्टी बाहेर पुरवत असल्याचे मी मुख्यमंत्री यांच्या कानावर घातले आहे. याबाबत चौकशी करण्याची मागणी देखील केली केली असल्याचे सत्तार यांनी म्हंटले.