सातारा | कोणतीही निवडणूक आली कि भर अर्ज आणि हो उभा असा पवित्रा असणारे बिग बॉस मराठी फेम अभिजित बिचुकले यांना न ओळखणारे काही फारसेच असतील. त्यामुळे यांच्याबद्दल आम्ही फार काय सांगणार. सतत ह्या ना त्या कारणामुळे चर्चेत असणारे अभिजित बिचुकले याना फक्त एक कारण पुरेसं असत. तेव्हढं मिळालं कि ह्यांचा झेंडा सगळ्यात वर मिरवायला सज्ज. आता काय? तर म्हणे, सातारा पालिका निवडणुकीत उतरणार. होय. अभिजित बिचुकले याना तसही साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांचे कट्टर विरोधक म्हणून ओळखले जातेच. मात्र यावेळी त्यांनी दोन्ही राजांच्या पॅनेल विरोधात शड्डू ठोकला आहे.
माध्यमांशी बोलताना अभिजित बिचुकले यांनी म्हटले कि, मी व माझी पत्नी नगरपालिका लढत नाहीत. मात्र माझी जी स्वाभिमानी वृत्ती आहे आणि माझा जो बाणा आहे त्या अनुषंगाने या नगरपालिकेतील राजकीय, प्रशासकीय भ्रष्टाचार मला बाहेर काढायचे आहेत. इथल्या नगरसेवकांची भाषा काय? इथले सत्ताधीश, अध्यक्षक लोक लोणी खातात. आणि सातारकरांची नेते पवार साहेबांकडून पराभूत होतात तर अभिजितबिचुकले कडून जर पराभूत झाले तर वावग काय? मी शिव छत्रपतींचा वैचारिक वारसा जपतो आणि ही नगरपालिका माझ्या ताब्यात यावी एवढीच माझी अपेक्षा आहे.
स्वतःचे पॅनेल उभारणार असल्याचे स्पष्टपणे सांगताना बिचुकले म्हणाले, सातारा विकास आघाडी व नगर विकास आघाडीच्या नेत्यांनी नगरपालिकेचे वाटोळे केले आहे. ह्यांच्या इच्छेने नगरसेवक निवडून पाहिजे तसे टेंडर घ्यायचे आणि वाटोळं करायचे. कामाची काही क्वालिटी नाही. मी अभिजित बीचुकले ‘स्वाभिमानी सातारकर विचारमंच’ अश्या नावाने लवकरच माझ्या आघाडीची स्थापना करून संपूर्ण नगरपालिका ताब्यात घेण्याचा प्रश्न उपस्थित करून मी जिंकणार आहे. पुढे उदयनराजेंच्या आव्हानाबाबत विचारले असता ते म्हणाले, आव्हान आहेच. त्यांना कळत नाही का? त्यांच्याच माणसांनी लोकसभेला त्यांना हरवून टाकलं.
पुढे, मग ते कुठल्या जाती धर्माचे आहेत ते त्यांनी ओळखावं. मी नव्हतो त्या निवडणुकीला नायतर माझ्या डोक्यावर खापर फोडलं असत की, अभिजितमूळे मी पडलो. पण तुम्ही कुठे पडलात क्षुल्लक माणसांनी पाडलं राव. मग अभिजित बिचुकलेने सातारा नगरपालिका बळकावली तर अभिमान वाटेल त्यांना सुद्धा. अश्या आशयाचे वक्तव्य करून एकंदर अभिजित बिचुकले यांनी उदयनराजेंना पुन्हा एकदा आव्हान दिले का काय? असाच काहीसा प्रश्न उपस्थित झाला आहे.