मला एक दिवसाचा मुख्यमंत्री करा ; अभिजीत बिचुकलेंचं थेट उद्धव ठाकरेंना पत्र

0
47
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बिग बॉस फेम अभिजित बिचुकले नेहमी आपल्या काही बेताल विधानासाठी प्रसिद्ध आहेत. दरम्यान आता अभिजित बिचुकले यांनी उद्धव ठाकरेंकडे एक दिवसाचा मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केलीय. तशा आशयाचं पत्रच अभिजीत बिचुकले यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलंय. उद्धव ठाकरे तुम्ही राजीनामा तरी द्या अन्यथा सक्तीच्या रजेवर जा. तुमचे सर्व मंत्री निष्क्रिय आहेत. मला 8 मार्च या महिला दिनाच्या दिवशी मुख्यमंत्री करा. असे पत्र अभिजीत बिचुकले यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलं.

नायक चित्रपटातील अनिल कपूरसारखेच अभिजित बिचुकलेंनी एक दिवस मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केलीय. नायक चित्रपटात अभिनेता अनिल कपूर एक दिवसाकरिता मुख्यमंत्री होतो आणि समाजात बोकाळलेल्या भ्रष्टाचारावर अंकुश आणतो आणि सामान्य जनतेचे प्रश्न सोडवतो. त्या काळात नायक चित्रपटाला चांगलीच प्रसिद्धी मिळाली होती. बिग बॉस कार्यक्रमानंतर साताऱ्याचे अभिजित बिचुकले हे आता एक दिवसाचा मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत.

पत्रात बिचुकले लिहितात, लोकशाहीत जनता सर्वश्रेष्ठ आहे. राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे कुटुंबप्रमुख आहात आणि गेल्या वर्षभर आपणच आपल्या बंगल्यातून बाहेर येत नाही. मुख्यमंत्री या नात्याने प्रशासनावर तसेच सहकारी मंत्र्यांवर अंकुश ठेवू शकलेला नाहीत. कोरोना महामारीत आपण आणि आपले सरकारी नियोजन कमकुवत आहे, हे जनतेच्या निदर्शनास आलेले आहे.

ज्या प्रकारे आपण मुख्यमंत्री झालात त्याच प्रकारे जनतेच्या सेवेसाठी आपण मला एक दिवस स्वच्छेने राजीनामा देऊन किंवा सक्तीच्या रजेवर जाऊन मला फक्त एक दिवस मुख्यमंत्रिपदावर नियुक्त करा. मग बघा मी संपूर्ण मंत्रिमंडळ आणि प्रशासन कसे सुतासारखे सरळ करतो बघा, असे मत बिचुकलेंनी पत्रात व्यक्त केलंय.\

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here