पालकमंत्र्याचं बालक आता जागं झाल का? नगराध्यक्षा शिंदेंचा विरोधी पक्षनेते सौरभ पाटीलांना टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

आम्ही सर्वसामान्यांनाचा विचार करून विकासाभिमुख बजेट सादर केले होते. एवढ्या वर्षाचा अनुभव असणारी ही लोक त्यांना एवढही समजू नये का ? केवळ विरोधकला विरोध करायचा ही भावना खूप चुकीची आहे. पालकमंत्र्यांचे बालक यांनी माझ्यावर टीका केली, की माझा गृहपाठ कच्चा आहे. तेव्हा त्यांनी अभ्यास करावा. केवळ माझी मापे काढणे हे योग्य नाही. पालकमंत्र्याचे बालक आता जागं झालं आहे का असा सवालही यावेळी नगराध्याक्षा रोहिणी शिंदे यांनी नगरसेवक सौरभ पाटील यांना लगावला आहे. विरोधकाला विरोध करायचा ही भावना चुकीची आहे. स्वतःचा नाकर्तेपणा लपवण्यासाठी विरोधकांचा हा सर्व आटापिटा चालू आहे अस त्या म्हणाल्या.

#Karad : पालकमंत्र्याचं बालक आता जागं झाल का? Rohini Shinde यांचा विरोधी पक्षनेते Saurabh Patil टोला

नगरसेवक विनायक पावसकर म्हणाले, ज्या सदस्यांचे काम असेल तो सूचना वाचू शकतो.  ऑफिसकडून येणाऱ्या सूचना या नगराध्यांक्षा सांगतील त्यांनी वाचावी. बजेटच्या सभेच्या अगोदर 21, 27 व 29 जानेवारीला दोन सभा अशा चार सभा स्थायी समितीच्या झालेल्या आहेत. तेव्हा जनशक्ती आणि लोकशाही आघाडीतील सदस्य काय करत होते. पालकमंत्र्यांच्या घऱातील माणूस सौरभ पाटील
म्हणतात, पालकमंत्र्यांना जावून प्रस्ताव देण्यासाठी भेटा मग तुम्ही काय करता.

सभेत अर्थसंकल्पावर टीका करता, स्थायी समितीत तुम्हीं तोंडाला कुलुप लावून बसले होता का ? की या आठ जणांच्या दबावाखाली होता. सभागृहात सूचना वाचण्यावरून वाद होत आहे. तसेच सत्ताधारी प्रश्नांनात्तरे देणार नसतील तर सगळ्या सभापतींनी राजीनामे द्यावेत. असेही ते म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’