हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बॉलीवूडचे बिग बी अमिताभ बच्चन आणि अभिनेत्री जया बच्चन यांचा मुलगा अभिनेता अभिषेक बच्चन आपल्या आईवडिलांच्या पाउलांवर पाऊल ठेवत राजकारणात एंट्री करणार असल्याच्या बातम्या पसरत आहेत. अभिषेक बच्चन अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात प्रवेश करणार असून तो अलाहाबाद मतदारसंघातून निवडणूक सुद्धा लढवेल अशा चर्चा सध्या जोरदार सुरु आहेत. मात्र स्वतः अभिषेकने मात्र याबाबत काहीही स्पष्टपणे सांगितलेलं नाही.
उत्तरप्रदेशात अभिषेक बच्चन यांच्या राजकारणातील प्रवेशाची चर्चा जोरदार सुरु आहे. मात्र समाजवादी पार्टीकडून सुद्धा याबाबत काहीही अधिकृतरीत्या सांगितलेलं नाही . यापूर्वी अभिषेकबच्चन यांचे बच्चन यांनी 1984 मध्ये अलाहाबाद मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. आता अभिषेकने सुद्धा जर त्याचा जागेवरून निवडणूक लढवली तर पुन्हा एकदा नवा इतिहास तयार होईल. परंतु एका वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, या सर्व गोष्टी केवळ अफवा आहेत, यात कोणतेही तथ्य नाही असं सांगण्यात आले आहे.
अभिषेकच्या ‘त्या’ विधानाची पुन्हा चर्चा –
याआधी अभिषेकने 2013 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत राजकारणातील प्रवेशाबद्दल भाष्य केलं होते. राजकारणात एंट्री करणार का? असा सवाल त्याला त्यावेळी केला असता तो म्हणाला होता, माझे आई-वडील राजकारणात आहेत, पण मी राजकारणात जाणार नाही. पडद्यावर मी एका नेत्याच्या भूमिकेत दिसू शकतो. परंतु खऱ्या आयुष्यात नाही. मी कधीच राजकारणात येणार नाही.