म्हणून झाली सुप्रिया सुळे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात भेट

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भोर प्रतिनिधी | राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून गणला जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघाला सुरुंग लावण्याचा इरादा भाजपने केला आहे. म्हणून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात भाजपने कांचन कुल यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विजयासाठी आता चंद्रकांत पाटील यांनी कंबर कसली आहे.

बारामतीत भाजपचा उमेदवार  विजयी करण्यासाठी खासदार संजय काकडे यांच्या निवासस्थानी चंद्रकांत पाटील यांनी रणनीती आखली आणि  त्यानंतर ते भोर तालुक्यातील बांडेवाडी येथे यात्रेसाठी गेले. त्याठिकाणी राष्ट्रवादीच्या बारामती मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे समोरून आल्याबरोबर चंद्रकांत पाटील यांनी त्यांना हात जोडले. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी  देखील आपल्या पेक्षा जेष्ठ असणाऱ्या नेत्याला हात जोडून त्यांचा मान राखला. दोघांमध्ये थोडी चर्चा झाली आणि चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना औपचारिक रित्या निवडणुकीसाठी शुभेच्छा देखील दिल्या. 

एकंदरच लोकशाही म्हणजे रक्त विरीहीत सत्ता स्थापनेची क्रांती असते यावर अशा भेटीमुळे विश्वास बसतो. आज सकाळीच सोलापूरचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. त्यामुळे शनिवारचा दिवस राजकीय भेटीगाठींचा होता का असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.

लोकसभा निवडणुकांच्या सर्व ताज्या घडामोडी घरबसल्या मोफत मिळवण्यासाठी आजच आमचा WhatsApp ग्रुप जाॅइन करा. Facebook Page लाईक करा.

WhatsApp Group – 9890324729
Facebook Page – Hello Maharashtra

इतर महत्वाचे –

वाराणसीत मोदींच्या पराभवासाठी कॉंग्रेसने आखली हि खेळी ?

साताऱ्यात दहशत अन् स्टाईल चालणार नाही ; आदित्य ठाकरेंचा उदयनराजेंना टोला

आंबेडकर- शिंदे यांच्या भेटीने राजकीय चर्चेला उधाण

म्हणून झाली सुप्रिया सुळेआणि चंद्रकांत पाटील यांच्यात भेट

अमरावती : बच्चू कडू देणार शिवसेनेला पाठिंबा ?

शरदराव तुम्हाला झोप कशी येते, मोदींचा पवारांना सवाल

पिळदार मिशी न्हवे तर स्वकर्तृत्व हे पुरुषार्थाचं लक्षण – उदयनराजे भोसले

1 thought on “म्हणून झाली सुप्रिया सुळे आणि चंद्रकांत पाटील यांच्यात भेट”

Leave a Comment