हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या (Sushant Singh Rajput) निधनाला अनेक वर्षे झाली असली, तरीही त्याच्या आठवणी आजही चाहत्यांच्या मनात ताज्या आहेत. १४ जून २०२० रोजी त्याने वांद्रे येथील आपल्या घरात गळफास घेऊन आत्म्हत्या केली होती. मात्र, ही आत्महत्या नसून हत्या असल्याचा दावा अनेकांकडून केला जात आहे. त्यामुळे अजूनही या प्रकरणाचा तपास सुरूच आहे. आता या प्रकरणात डॉ. मनमीत कुमार (Manmit kumar) यांनी एक मोठे वक्तव्यं केले आहे.
अध्यात्मिक गुरू आणि सायकिक मीडियम म्हणून प्रसिद्ध असलेल्या डॉक्टर मनमीत कुमार यांनी नुकतेच धक्कादायक विधान केले आहे. त्यांनी म्हणले आहे की, सुशांत सिंह राजपूतचा आत्मा अद्यापही या जगात आहे आणि तो आपल्या मृत्यूचे सत्य लोकांसमोर यावे, अशी इच्छा व्यक्त करत आहे. इतकेच नव्हे तर, गेली दोन वर्षे सुशांतचा आत्मा त्यांच्या संपर्कात असल्याचा दावा मनमीत कुमार यांनी केला आहे.
डॉक्टर मनमीत कुमार यांनी सांगितले की, एका योगा सेशनदरम्यान त्यांनी प्राणायाम संपवल्यानंतर डोळे उघडले, तेव्हा सुशांतचा आत्मा त्यांच्या समोर बसलेला दिसला. सुरुवातीला त्या घाबरल्या पण नंतर त्यांना कळाले की तो सुशांत सिंह राजपूत आहे. सुशांत त्यांना सतत विचारत होता, “माझी कहाणी तू अजून लोकांसमोर का मांडली नाहीस?”
पुढे बोलताना मनमीत कुमार यांनी सांगितले की सुशांतच्या आत्म्याची इच्छा आहे की त्याच्यावर एक पुस्तक लिहिले जावे आणि त्याच्या मृत्यूबाबतचे सत्य समोर यावे. डॉक्टर कुमार यांनी असेही सांगितले की, सुशांत अजूनही लोकांच्या प्रेमाने आणि आपल्या अपूर्ण इच्छांमुळे या जगात अडकलेला आहे. दरम्यान, डॉक्टर मनमीत कुमार यांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. अनेकांनी त्यांच्या वक्तव्यावर विश्वास ठेवत सुशांतच्या न्यायाची मागणी केली आहे. तर काहींनी मनमीत कुमार यांच्यावरच टीका केली आहे.