हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत दमदार भाषण करताना भाजप आणि विरोधकांचा आपल्या ठाकरे शैलीत समाचार घेतला. बाबरी पाडताना येरेगबाळे पळून गेले आणि बाळासाहेब राहिले होते हे लक्षात असू द्या. जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली तर मला त्याचा अभिमान आहे, असे शिवसेनाप्रमुख म्हणाले होते. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे सपा नेते अबू आझमी यांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला आहे.
अबू आझमी म्हणाले, उद्धव ठाकरे हे आता शिवसेनेचे नेते नाहीत, ते राज्याचे प्रमुख आहेत. त्यांनी असं बोलायला नव्हतं पाहिजे. ही खूपच दुख:द घटना आहे. हे सरकार कॉमन मिनिमम प्रोग्रामने चालते. उद्धव ठाकरे यांनी बाबरी मशीद पाडल्याचे समर्थन केले तेव्हा या मुस्लीम नेत्यांना लाज वाटायला पाहिजे होती. तसेच महाविकासआघाडी सरकारमधील मुस्लीम नेत्यांनी एव्हाना राजीनामा द्यायला पाहिजे होता, असे अबू आझमी यांनी म्हटले.
नक्की काय म्हणाले होते उद्धव ठाकरे –
बाळासाहेबांची आठवण तुम्ही वेळोवेळी काढता, त्यांना विसरला नाहीत. त्यासाठी धन्यवाद पण त्यांचे हिंदुत्व तुम्ही विसरू नका हे माझे सांगणे आहे. बाबरी पाडताना येरेगबाळे पळून गेले आणि बाळासाहेब राहिले होते हे लक्षात असू द्या. जर माझ्या शिवसैनिकांनी बाबरी पाडली तर मला त्याचा अभिमान आहे, असे शिवसेनाप्रमुख म्हणाले होते. तेव्हा बाबरी आम्ही पाडली नाही म्हणून तुम्ही हात वर केले होते, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’