Amazon, Paytm पासून Tata पर्यंत सर्व कंपन्या RBI कडून ‘हे’ लायसन्स मिळवण्याच्या शर्यतीत, याविषयी जाणून घ्या

नवी दिल्ली । रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला (RBI) देशातील वाढते डिजिटल पेमेंट्स पाहता नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) चा पर्याय म्हणून स्वतंत्र डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म तयार करायचा आहे. खासगी कंपन्या असे प्लॅटफॉर्म तयार करतील. म्हणूनच, टाटा सन्स, पेटीएम आणि अ‍ॅमेझॉन (Amazon) इ. आपापले कन्सोर्टियम प्लॅटफॉर्म तयार करण्याच्या शर्यतीत आहेत.

या सर्व कंपन्यांना प्लॅटफॉर्म साठी आरबीआय कडून न्यू अंब्रेला एंटिटी (NUE) लायसन्स मिळवायचा आहे. या लायसन्स द्वारे ते देशात NPCI चा पर्याय म्हणून स्वतंत्र डिजिटल पेमेंट प्लॅटफॉर्म तयार करण्यास सक्षम असतील. RBI ने NUE साठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2021 पर्यंत वाढविली आहे. यापूर्वी, अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 फेब्रुवारी 2021 होती.

यासाठी गरज आहे
ज्याप्रमाणे NPCI देशातील UPI, IMPS, NEFT यासारख्या इतर पेमेंट सिस्टीमवर नियंत्रण ठेवत आहे, त्याचप्रमाणे न्यू अंब्रेला एंटिटी देखील आपली नवीन पेमेंट सिस्टम तयार करेल. सरकार आणि RBI चा विश्वास आहे की, आगामी काळात डिजिटल पेमेंटची वाढती संख्या एकटी NPCI नियंत्रित करू शकणार नाही. NUE NPCI शी सामना करेल. त्याच वेळी, न्यू अंब्रेला एंटिटीच्या माध्यमातून, RBI ला रोख व्यवहार आणि डिजिटल पेमेंट सिस्टीममध्ये नवीन प्लेयर्सची एंट्री वाढवायची आहे. याद्वारे डिजिटल पेमेंट पूर्णपणे पारदर्शक होईल आणि त्याद्वारे सर्व प्रकारच्या पेमेंटमुळे करचुकवेगिरीवरही नजर ठेवता येते.

कंपन्या कन्सोर्टियमच्या माध्यमातून मैदानात दाखल झाल्या

टाटा सन्स (Tata Sons) ने एचडीएफसी बँक (HDFC Bank), कोटक महिंद्रा बँक, मस्तकार्ड, भारती आणि पेयू (PayU) यांच्या संयुक्त विद्यमाने अर्ज केला आहे.

अ‍ॅमेझॉन (Amazon), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank), अ‍ॅक्सिस बँक, पाइन लॅब्ज, बिलडेस्क आणि व्हिसा कार्ड (Visa Card) यांनी संघटनेद्वारे त्याकरिता अर्ज केला आहे.

पेटीएम (Paytm), इंडसइंड बँक (IndusInd Bank), ओला फायनान्शियल्सनी (Ola Financials) काही इतर कंपन्यांसमवेत एकत्र अर्ज केला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like