आर्थिक मंदीचं सावट? IT सेवा फर्म Accenture 19 हजार नोकरकपात करणार

accenture
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या जगभरात आर्थिक मंदीचे सावट आहे. ज्यामुळे गेल्या काही महिन्यांत अनेक मोठमोठ्या IT कंपन्यांकडून कर्मचारी कपात केली जाते आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता आयटी सेवा फर्म असलेल्या Accenture Plc ने सांगितले की,” ते सुमारे 19,000 नोकर्‍या कमी करून वार्षिक महसूल आणि नफ्याचा अंदाज कमी करतील.” सध्याच्या बिघडत चाललेल्या जागतिक आर्थिक दृष्टीकोनामुळे आयटी कंपन्या आपल्या सेवांवरील कॉर्पोरेट खर्च कमी करत असल्याचे हे आणखी एक उदाहरण आहे.

याबरोबरच कंपनीने गुरुवारी आपली वार्षिक महसूल वाढ आणि नफ्याचा अंदाज देखील कमी केला आहे. मंदीबाबत सावधगिरी बाळगताना कंपनीकडून बजेटमध्ये आणखी कपात केली जाणार असल्याचे म्हंटले आहे. तसेच आता कंपनीला वार्षिक महसूल वाढ आधीच्या 8% ते 11% च्या तुलनेत 8% ते 10% च्या श्रेणीत राहण्याची अपेक्षा आहे. तसेच कंपनीने $16.1 अब्ज आणि $16.7 बिलियनच्या श्रेणीतील चालू-तिमाही महसुलाचा अंदाज व्यक्त केला आहे.

हे लक्षात घ्या कि, नुकतेच अ‍ॅमेझॉनने देखील येत्या काही आठवड्यांत 9,000 हुन जास्त कर्मचार्‍यांना काढून टाकणार असल्याची घोषणा केली आहे. या जागतिक ई-कॉमर्स दिग्गज कंपनीने याआधीच सुमारे 18,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. त्याचप्रमाणे फेसबुकची पॅरेण्ट कंपनी असलेल्या मेटा प्लॅटफॉर्म्सनेही म्हटले की,” ते या वर्षी 10,000 नोकर्‍या कमी करणार आहेत.”