Accident News : अमरावती- नागपूर महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात; 28 जखमी, 1 ठार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विदर्भातून एक मोठी बातमी समोर येत आहे. अमरावती- नागपूर महामार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात (Accident News) झाला आहे. रस्त्यात आडव्या आलेल्या गाईला वाचवण्याच्या नादात शिवशाही बस पलटी झाली. या भीषण अपघातात 28 प्रवासी जखमी झाले तर एका प्रवाशाला आपला जीव गमवावा लागला. आज सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातामुळे सदर महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, सदर अपघातग्रस्त शिवशाही बस नागपूरहून अकोल्याच्या (Nagpur To Akola Shivshahi Bus) दिशेने निघाली होती. यावेळी अमरावती-नागपूर महामार्ग क्रमांक 6 वर अचानकपणे एक गाय या बसच्या आडवी आली. यावेळी बस चालकाने गाईला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र गाईला वाचवण्याच्या नादात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. या अपघातात 28 प्रवासी जखमी झाले आहेत. तर एका प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. आसपासच्या नागरिकांनी या अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

बसच्या चालकाने सांगितला घटनाक्रम- Accident News

दरम्यान, हा अपघात (Accident News) नेमका कसा झाला याची माहिती बस चालकाने सविस्तर सांगितली आहे. मी नागपूरहून अकोल्याकडे बस घेऊन जात होतो. त्यावेळी अचानक एक गाय महामार्गावर धावत आली. मी बसवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला. पण बस पलटी झाली. अशी प्रतिक्रिया या अपघातग्रस्त शिवशाही बसच्या चालकाने दिली

या अपघातामुळे महार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात. सध्या क्रेनच्या मदतीने शिवशाहीला सरळ करण्याचे काम सुरु आहे. समोरून शिवशाहीचा फोटो बघूनच अपघाताची तीव्रता किती मोठी आहे ते समजेल. समोरच्या बाजूने बसचे मोठं नुकसान झालं आहे.