खळबळ उडाली : शिवशाही बसमध्ये मृतदेह आढळला

Shivshahi bus Karad

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी कराड येथील बसस्थानकात शिवशाही बसमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे बसस्थानक परिसरात तसेच प्रवाशांच्यात खळबळ उडाली. तात्काळ घटनास्थळी कराड शहर पोलिसांनी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करीत आहेत. घटनास्थळावरून व शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कराड बसस्थानकरात गेल्या 15 दिवसापासून एकाच जागेवर उभ्या … Read more

साताऱ्यात शिवशाही बसखाली सापडून वृध्द महिला ठार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा मध्यवर्ती बस स्थानकात आज सकाळ सात वाजण्याच्या सुमारास शिवशाही बसच्या चाकाखाली सापडून वृद्ध फिरस्त महिला जागीच ठार झाली आहे. गौडाबाई काळे (वय- 75) असे संबंधित महिलेचे नाव आहे. सकाळी बसस्थानकात झालेल्या या अपघातामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, सातारा बसस्थानकात आज शुक्रवारी 3 जून रोजी … Read more

पेट्रोल- डिझेल संपल्याने शिवशाहीचा बसेस खोळंबा : प्रवाशांचे हाल

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके जिल्हा पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने एक दिवस देशव्यापी पेट्रोल- डिझेल खरेदी न करण्याचा निर्णय घेतला होता. पेट्रोल पंप चालकांच्या फामपेडा संघटनेने केंद्र सरकारच्या धोरणाच्या विरोधात 31 मे रोजी ‘नो परचेस डे’ आंदोलन केले. या आंदोलनाचा फटका आज 1 जून रोजी वाहनचालकांना तसेच एसटी महामंडळाला बसला. महामार्गावर अनेक पेट्रोल पंपावर पेट्रोल- डिझेल … Read more

आगारात उभ्या शिवशाहीच्या बॅटऱ्या चोरीला

Aurangabad

औरंगाबाद – मागील अनेक दिवसांपासून एसटी कर्मचारी बेमुदत संपावर गेल्यामुळे लालपरी सह शिवशाही बसची मोठी दुर्दशा झाली आहे. यातच सिडको बस आगारात उभ्या असलेल्या गाड्यांच्या महागड्या बॅटऱ्या चोरीला जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवशाहीसह मालवाहतूक गाड्यांच्या 18 बॅटऱ्या चोरीला गेल्यामुळे एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 20 जानेवारी रोजी चार शिवशाही एक … Read more

‘शिवशाही’ ने दिवसभरात कमावून दिले दोन लाखांचे उत्पन्न

shivshahi

औरंगाबाद – एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरणाच्या मागणीसाठी दोन महिन्यांपासून संप पुकारला आहे. प्रशासनाने संपावरील कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर हजर राहण्याचे आवाहन केले. या आवाहनानंतर काही कर्मचारी कामावर हजर झाले, तर काही अजूनही कामावर हजर झाले नाहीत. जे हजर झाले त्यांच्या मदतीने व खाजगी शिवशाहीच्या वतीने प्रवासी वाहतूक सध्या सुरू आहे. काल दिवसभरात पुणे मार्गावर 14 खाजगी शिवशाही … Read more

जिल्ह्यात धावल्या 126 बसेस, तर 950 कर्मचारी परतले कामावर

st bus

औरंगाबाद – औरंगाबाद विभागात आत्तापर्यंत 950 कर्मचारी कामावर परतले आहेत. काल दिवसभरात औरंगाबाद विभागातून 126 बस धावल्या. या बसेसने 364 फेऱ्या करत 4 हजार 497 प्रवाशांना इच्छित स्थळी सोडले. पुणे मार्गावर 15 तर नाशिक मार्गावर 8 खाजगी शिवशाही बसेस चालवण्यात आल्या. सिडको बसस्थानकातून 1 हिरकणी, 29 लालपरीने 74 फेऱ्या केल्या. यातून 601 प्रवाशांनी प्रवास केला. … Read more

प्रवाशांना दिलासा ! जिल्ह्यात एसटी बसच्या फेऱ्या वाढल्या

st bus

औरंगाबाद – एसटीचे कर्मचारी कामावर परतत असल्याने बसच्‍या फेऱ्या काही अंशी वाढल्या आहेत. यामुळे प्रवाशांचा थोडासा दिलासा मिळाला आहे. रविवारी 81 बसच्या सहाय्याने तब्बल 270 फेऱ्या करण्यात आल्या. पुणे, नाशिक आणि अजिंठा लेणी मार्गावर 25 शिवशाही, आठ हिरकणी बस चालवण्यात आल्या. एकूण 4427 प्रवाशांनी प्रवास केला. रविवारी औरंगाबाद-पुणे मार्गावर 17 शिवशाही चालवण्यात आल्या, त्यातून 726 … Read more

एका चालकाने ढोसली दारू, दुसऱ्याने धडकवली गाडी अन् तिसऱ्याने तर चुकवला रस्ता

shivshahi

औरंगाबाद – प्रवाशांच्या सेवेसाठी हे बिरुद घेऊन एसटी महामंडळाने औरंगाबाद-पुणे मार्गावर खाजगी शिवशाहीची सेवा सुरु केली आहे. याच खाजगी चालकांचा मनमानीचा त्रास शनिवारी पुण्याहून औरंगाबादला येणाऱ्या प्रवाशांना सहन करावा लागला. यामध्ये एक चालक दारू पिऊन होता, दुसऱ्या चालकाने गाडीला ठोकले तर तिसर्‍या चालकाला रस्ताच माहीत नसल्याने पुणे दर्शन करत प्रवाशांना औरंगाबादेत पोहोचण्यास दहा तासांचा खडतर … Read more

जिल्ह्याभरात 47 लालपरींची चाके रस्त्यावर, ‘या’ मार्गावर झाल्या फेऱ्या

st bus

औरंगाबाद – एसटी महामंडळाच्या औरंगाबाद विभागात काल दिवसभरात तीन संपकरी कर्मचाऱ्यांना ‘बडतर्फ का करण्यात येऊ नये’ अशा नोटिसा बजावण्यात आल्या, तर दुसरीकडे चालू झालेल्या लाल परिणाम प्रवाशांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना लालपरिंचे चाके हळूहळू रस्त्यावर येत असल्याने प्रवाशांमध्ये समाधान व्यक्त केल्या जात आहे. जिल्ह्यातील 5 आगारात मिळून एकूण 47 लालपरींनी … Read more

पुणे मार्गावर धावल्या 180 खासगी शिवशाही बसेस

औरंगाबाद – आपल्या विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपामुळे विविध मार्गांवर धावणारे लालपरी ठप्प झाली आहे. औरंगाबादेतून पुणे मार्गावर सर्वाधिक प्रवासी असल्यामुळे या मार्गावर मध्यवर्ती बसस्थानकातून प्रवाशांच्या सेवेसाठी एसटी महामंडळाच्या वतीने खाजगी शिवशाही सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी 14 नोव्हेंबर पासून आतापर्यंत महामंडळाच्यावतीने 180 खासगी शिवशाही बसेस पुणे मार्गावर चालवण्यात आल्या आहेत. यातून … Read more