हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्यामध्ये दिवसेंदिवस रस्ते अपघाताच्या प्रमाणात वाढ होत चाललेली आहे. कारण आता पुन्हा एकदा अहमदनगर येथून भयानक अपघात झाल्याची बातमी समोर (Accident News) आली आहे. कल्याण-नगर महामार्गावर एसटी बस, कार आणि ट्रॅक्टर अशा तीन वाहनांची धडक झाल्यामुळे भीषण अपघात घडला आहे.. या अपघातामध्ये एकूण सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात बुधवारी पहाटे 2.30 च्या सुमारास झाला असल्याचे सांगितले जात आहे. सध्या सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटेच्या वेळी कल्याण निर्मल महामार्गावर ऊस वाहणारा ट्रॅक्टर आणि ठाणे – मेहकर एस.टी बस तसेच इको गाडी ढवळपुरी फाटया जवळून जात होती. याचवेळी तिन्ही वाहने जोरात एकमेकांना धडकली. या अपघातामध्ये वाहनांमध्ये असलेले सहाजण जागीच ठार झाले. हा अपघातीत का भीषण होता की, तिने वाहने चक्काचूर झाली. तसेच इतर प्रवासी गंभीर जखमी झाले. या सर्वांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र मृतांची संख्या वाढण्याची भीती पोलिसांनी व्यक्त केली आहे.
मुख्य म्हणजे, या अपघाताची माहिती मिळतात (Accident News) तातडीने नागरिकांनी आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यानंतर त्यांनी वाहनांमध्ये अडकलेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचे कार्य सुरू केले. तसेच घटनास्थळी ऍम्ब्युलन्स बोलवत जखमींना रुग्णालयात हलवले. या अपघातामुळे काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सेवा पुन्हा सुरळीत केली. सध्या पोलीस अपघात झालेल्या व्यक्तींची ओळख पटविण्याचा प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, सध्याच्या घडीला राज्य सरकार नवनवीन महामार्गे निर्माण करण्याचे प्रकल्प उभारत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला राज्यामध्ये रस्ते अपघाताच्या (Accident News) प्रमाणात देखील तितकीच वाढ झाल्याचे दिसत आहे. चालकाचे नियंत्रण सुटणे, गाडी वेगाने चालवणे, गाडी दारू पिऊन चालवणे अशी अनेक कारणे अपघातासाठी कारणीभूत ठरत आहेत. महत्वाचे म्हणजे, या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक यंत्रणा प्रयत्न करत आहे.