पुणे- बंगलोर महामार्गावर केमिकलच्या टेम्पोला अपघात, सर्वत्र पिवळा धूर पसरल्याने नागरिकांच्यात भीती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा शहराजवळील पुणे- बंगलोर महामार्गावर केमिकल गॅसने भरलेल्या पिकअप टेम्पोला अपघात झाल्याची घटना घडली आहे. टेम्पोंच्या अपघातानंतर केमिकलचा पिवळ्या रंगाचा धूर महामार्गवर पसरल्याने लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने या अपघातात जिवीतहानी झालेली नाही.

साताऱ्यातील वाढे फाटा येथे सायंकाळच्या सुमारास टेम्पोंचा अपघात झाला. या अपघातात टेम्पोंतील केमिकलच्या काचेच्या बाटल्या फुटल्या आणि रस्त्यावर सर्वत्र केमिकल पडलेले होते. तसेच त्या केमिकलचा पिवळा रंग परिसरात पसरल्याने लोकांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

महामार्गावरून ये- जा करणाऱ्या लोकांना या धुराचा डोळ्यांना त्रास होत होता. यावेळी पोलिस घटनास्थळी दाखल झालेले होते, त्यांनी तेथे जमलेल्या लोकांना हटविण्याचे काम केले. तर अग्निशमन दलाने महामार्गावर पाण्याचा फवाऱ्याने रस्ता स्वच्छ करून घेतला. परंतु या केमिकलच्या टेम्पोंच्या अपघाताने लोकांच्यात मोठी भीतीचे वातावरण पसरलेले पहायला मिळाले.

Leave a Comment