दुर्घटनांचे सत्र थांबेना ! केवळ ५ मिनिट ऑक्सिजन पुरवठा थांबला…11 रुग्णांचा तडफडून मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली वृत्तसंस्था: देशात कोविड रुग्णालयांमध्ये दुर्घटना घडण्याचे सत्र काही थांबताना दिसत नाहीये. महाराष्ट्रातील घटना, गुजरात मधील घटना त्यानंतर आता आंध्र प्रदेश मध्ये देखील अशीच एक घटना समोर आली आहे. आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील रुईया रुग्णालयात ऑक्सिजनचा पुरवठा बंद झाला तब्बल 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या रुग्णालयात कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. या दरम्यान अचानक ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्याने घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा संपूर्ण देश हादरला आहे.

सध्या संपूर्ण देशामधले covid-19 ने थैमान घातले आहे. तिरुपती रुग्णालयातील अतिदक्षता विभागात covid-19 रुग्ण दाखल आहेत. दरम्यान ऑक्सिजन पुरवठा थांबताच राखीव ठेवण्यात आलेले ऑक्सीजन सिलेंडर लावण्याचा प्रयत्न झाला पण त्याच पाच मिनिटात श्वास घेता न आल्याने वेंटिलेटर वर असलेल्या 11 रुग्णांचा तडफडुन मृत्यू झाला. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान श्रीपेरम्बदुर इथून ऑक्सिजनचा टँकर मागवण्यात आला आणि रुग्णाच्या नातेवाइकांनी रुग्णालयात धाव घेतली असून तणावाचं वातावरण.

ही घटना घडल्यानंतर प्राथमिक माहितीनुसार चित्तूर चे जिल्हाधिकारी हरिनारायण यांनी रुईया येथील शासकीय रुग्णालयात 11 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. तर मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Comment