माळशिरसच्या युवकाचा तडवळे येथे अपघाती मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके

खटाव तालुक्यातील शिंदेवाडी ते कोल्हापुर असा प्रवास करत असलेल्या एका युवकाचा तडवळे येथे खाडे वस्तीवरील पुल परिसरात दुचाकी अपघातात मृत्यू झाला. गाडी अचानकपणे झाडीत गेल्याने युवकाचे डोके दगडावर आदळल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला.

रामचंद्र विजय चव्हाण (वय 38, रा. माळशिरस) असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, माळशिरस तालुक्यातील शिंदेवाडी येथील युवक रामचंद्र विजय चव्हाण (वय 38) हा बदली ड्रायव्हींगचा व्यवसाय करत होता. तो दुचाकी (क्र. एमएच 42 एबी 7108) हि गाडी देण्यासाठी कोल्हापुर येथे निघाला होता. शिंदेवाडी ते कोल्हापुर असा प्रवास करत असताना तडवळे ता. खटाव येथे आल्यानंतर येथील खाडे वस्तीवरील पुलावरुन गाडी संरक्षण कठडा तोडुन पडली. अचानकपणे दुचाकी पुलाशेजारी असलेल्या झाडीत गेल्याने युवकाचे डोके दगडावर आदळले. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर मार लागून त्याचा यात जागीच मृत्यू झाला.

संबंधित युवकाच्या अपघाताची घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. झाडीत युवक गाडीसह पड्ल्यामुळे दुचाकी आणि युवक निदर्शनास आले नाही. मात्र, परिसरात दुर्गंधी सुटल्याने नागरिकांना युवकाच्या अपघाताची माहिती मिळाली.
त्यानंतर नागरिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. अपघातात मृत्यू पावलेल्या रामचंद्र चव्हाण याच्या पश्चात आई, पत्नी, चार वर्षाची मुलगी व दहा वर्षाचा मुलगा, भाउ असा परिवार आहे. या घटनेची नोंद वडूज पोलिस ठाण्यात झाली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रमोद दिक्षित, हवालदार वाघमारे एस. एल., मल्हारी हांगे करीत आहे.

अगोदर बेपत्ता नंतर थेट मृत्यूची बातमी

दि. 18 रोजी या युवकाचा भाउ प्रविण चव्हाण याने गाडीचे व भावाचे वर्णन असलेला मेसेज व्हॉटसप वरती पाठविला होता. माझा भाउ रामचंद्र चव्हाण हा अद्यापही घरी आलेला नाही, कोणास आढळल्यास संपर्क करावा, असा त्याने उल्लेख केला होता. परंतू पाच दिवसातच त्याची अपघाताची बातमी मिळाली. त्यामुळे चव्हाण कुटुंबीयांना धक्का बसला.

Leave a Comment