Tuesday, February 7, 2023

BREAKING NEWS : साताऱ्यात दगडाने ठेचून एकाचा खून, आरोपी फरार

- Advertisement -

सातारा | शहरातील शाहुपुरी येथील दिव्यनगरी परिसरात एकाचा आज शुक्रवारी दि. 8 रोजी सकाळी खून केल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.  संतोष उर्फ विठ्ठल सुळ (वय- 45 वर्षे) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास टोळक्याने दिव्य नगरी परिसरात रस्त्यात अडवून संतोष सूळ यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. फरार संशयितांनी लाकडी दांडक्याने आणि दगडाने ठेचून खून केला आहे. आर्थिक देवाण-घेवाण आणि जमिनीच्या कारणातून हा खून झाल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर येत आहे.

- Advertisement -

संशयितांनी हल्ला केल्यानंतर सुळ गंभीर जखमी झाले. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. हल्ला केल्यानंतर संशयित आरोपी तेथून पसार झाले. सातारा पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा सुरू असून संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.