हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर आज रॅलीत सभेदरम्यान गोळीबार झाला. या घटनेमध्ये इम्रान खान जखमी झाले असून त्यांच्या पायाला जखम झाली आहे. यानंतर पाकिस्तानातं एकच खळबळ उडाली असून पाकिस्तानमधील तपास यंत्रणाकडून एका हल्लेखोरास अटक करण्यात आली आहे. त्या हल्लेखोरांनी इम्रान खान यांच्यावर गोळ्या झाडल्याची कबुली दिली असून त्यामागचे कारण सांगितले आहे.
पाकिस्तानच्या वझिराबादमधील झफऱ अली खान चौकात इम्रान खान यांच्या पक्षाचा ‘हकीकी आझादी मोर्चा’ पोहोचला तेव्हा गोळीबाराची घटना घडली. या घटनेतील आरोपीला अटक करण्यात आल्यानंतर त्याच्याकडे पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याने गोळीबार केल्याचे कबूल केले.
#BREAKING_NEWS
Confession Statement of Accused who fired at Imran Khan 😡😡 pic.twitter.com/UabeAg8Vna— Imran Ahmad Lone (@imranlone11) November 3, 2022
इम्रान खान लोकांना फसवत होता. मला हे पाहावलं नाही. मग मी त्याला मारण्याचा प्रयत्न केला. मी प्रयत्न केला की त्याला जीवे मारू शकेन. फक्त इम्रान खानलाच मारण्याचं मी ठरवलं होतं. इतर कुणालाही नाही. एकीकडे अजान सुरू होती आणि दुसरीकडे हे डेक लावून आरडा-ओरडा करत होते. याचा विचार करून माझ्या डोक्यात हे आलं”, असे संबंधित आरोपीने कबूल केले आहे.