4 वर्षांच्या चिमुरड्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याने जमावाकडून नराधमाला बेदम मारहाण

Rape
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर : हॅलो महाराष्ट्र – अहमदनगरमध्ये 4 वर्षांच्या चिमुरड्यासोबत अनैसर्गिक कृत्य (Rape) करणाऱ्या आरोपीला जमावाने ठार केले आहे. जमावाने आरोपीला केलेल्या मारहाणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अहमदनगर पोलिसांनी या मारहाणीप्रकरणी 4 आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र नायर, अजहर शेख, सिकंदर शाह, सोमनाथ गायकवाड अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

काय आहे नेमके प्रकरण ?
राजेश सोनार नावाच्या व्यक्तीने 4 वर्षाच्या चिमुरड्यासोबत अनैसर्गिक कृत्य (Rape) केले. चार दिवसांपूर्वी ही घटना समोर आली होती. ही घटना तेव्हा उघड झाली जेव्हा मुल घरात सापडले नाही. यानंतर या मुलाची शोधाशोध केली असता राजेश सोनार याच्या घरातून मुलाचा रडण्याचा आवाज येवू लागला. तेव्हा मुलाच्या आईने मुलाला बाहेर काढले आणि त्याला खाजगी रुग्णालयात नेले. त्यावेळी त्यांना आपल्या मुलांसोबत अनैसर्गिक कृत्य (Rape) झाल्याचे समजले. यानंतर पीडित मुलाच्या आईने तोफखान पोलिसात धाव घेऊन राजेश सोनार याच्या विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी राजेश सोनार याच्या विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधात्मक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल केला.

राजेश सोनार हा आणि तक्रारदार एकाच गल्ली राहत होते. संबधित प्रकार गंभीर असल्यामुळे राजेश सोनार याला उपस्थित चार जणांनी मारहाण केली. यामध्ये राजेश सोनार हा जखमी झाल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी या घटनेची दखल घेत व्हायरल व्हिडीओमध्ये आरोपीस मारहाण करणाऱ्या चौघांना अटक केली आहे.

हे पण वाचा :
BSNL च्या ‘या’ ब्रॉडबँड प्लॅनमध्ये 100 Mbps स्पीडसह मिळवा OTT बेनेफिट्स !!!

हिंगोलीत जुन्या वादातून मुलांनी जन्मदात्या वडिलांला संपवलं

भंडाऱ्यात मानसिक रुग्न महिलेने मंदिरात हनुमानाचा चांदीचा डोळा चोरला, घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

Aadhar card शी संबंधित फसवणूक कशी टाळावी???

रस्त्यावर झालेल्या वादानंतर कार चालकाने दुचाकीस्वाराला उडवले, धक्कादायक व्हिडिओ आला समोर