व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

नाॅन एनटीटी लोकांना मी ओळखत नाही : खा. उदयनराजेंचा संजय राऊतांना खोचक टोला

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

राज्यसभेवरून शिवेंद्रराजेंच्यावरती केलेले आरोप मला माहिती नाहीत अन् संजय राऊत कोण आहेत, ते मी ओळखत नाही. नाॅन एनटीटी लोक असतात, ती मला माहितीच नाहीत. मला माहिती असती तर सांगितले असते, असे म्हणत संजय राऊत यांना खोचक टोला खा. छ. उदयनराजे भोसले यांनी लगावला.

शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभेच्या उमेदवारीवरून साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर टीका केली होती. आता या टीकेवर छत्रपती उदयनराजे भोसले यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. साताऱ्यात पत्रकारांनी छत्रपती उदयनराजे यांना संजय राऊतांच्या टीकेवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी खासदार छ. उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात शिवसेना नेते संजय राऊत यांचा चांगलाच समाचार घेतला.

खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, संजय राऊत कोण मला माहित नाही. आम्ही कुणाबद्दल वाईट बोलत नाही. पण आमच्याबद्दल जर कोणी वाईट बोलल तर आम्ही बांगड्या घातल्या नाहीत. प्रत्येकाला आपल्या घराण्याचा स्वाभिमान आहे. त्यामुळे कोणी शांत बसणार नाही. बाकी काही पेटलं तरी चालेल बघतोच’.