वनविभागाची कारवाई : सातारा वनविभागाच्या हद्दीत अवैधरित्या झाडांची तोड करणारे दोघे ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | अवैधरित्या झाडांची तोड करून ट्रॅक्टर व टेम्पोच्या सहाय्याने विनापरवाना वाहतूक करणार्‍या दोन संशयीतांना सातारा वनविभागाने ताब्यात घेतले असून लाकूडमाल जप्त केला आहे. जयवंत रामचंद्र वाघमळे व शंकर रामचंद्र वाघमळे (दोघेही रा. कण्हेर) अशी संशयितांची नावे आहेत.

याबाबत वनविभागाने दिलेली माहिती अशी, दिनांक 31 ऑगस्ट रोजी शहर वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण यांना मौजे कोडोली -देगाव फाटा परिसरात आंबा, अशोक, भोकर इत्यादी झाडांची अवैधरित्या तोड करून विनापरवाना वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली. प्रत्यक्ष घटनास्थळी तपासणी करून माहिती घेतली असता. संशयितांनी कोणत्याही स्वरूपाची परवानगी घेतली नसल्यामुळे तसेच अवैधरित्या झाडांची तोड केल्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी दोन जणांवर कारवाई करत ताब्यात घेतले आहे.

याबाबत त्यांच्याकडील टेम्पो (एम.एच.09.ए.7583) व ट्रॅक्टर क्रमांक (एमएच- 13 टी- 8440) अशी दोन वाहने व लाकुड माल जप्त करण्यात आला आहे. पुढील कारवाई साठी सातारा गोडोली वनरोपवाटिका येथे आणून ठेवला आहे. सदरची कारवाई उपवनसंरक्षक सातारा महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल निवृत्ती चव्हाण, वनपाल प्रशांतकुमार पडवळ, वनरक्षक सुहास भोसले, राजकुमार मोसलगी, दशरथ फाळके, वाहनचालक संतोष दळवी यांनी केली.

Leave a Comment