खटावला अवैध वाळूवर कारवाई : सातारा पोलिसांकडून जेसीबी, ट्रक्टर ट्राॅलीसह 26 लाखाचा मुद्देमाल जप्त

0
89
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

खटाव गांवचे हद्दीत भराडे वस्ती येथील येरळा नदीच्या पात्रामध्ये अवैध वाळू उत्खनन चालु असताना सातारा गुन्हे शाखेकडून कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत जेसीबी व वाळूने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉलीसह 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पुसेगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील या कारवाईत 26,14,000/- (रूपये सव्हीस लाख चौदा हजार) इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अवैध वाळू उत्खनन व चोरटी वाहतुक करणाऱ्यांवर परिणामकारक कारवाई करणेबाबत एक पथक तयार करून जिल्हयात अवैध वाळू तस्करांवर कारवाई करण्याबाबत सुचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांना दि. 24/12/2021 रोजी यांना त्यांचे गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती.

सदर अनुषंगाने दि. 25/12/2021 रोजी पहाटे 2.45 वा.चे सुमारास खटाव (ता.खटाव जि. सातारा) गांवचे हद्दीत भराडे वस्ती येथे येरळा नदीचे पात्रात अचानक पोलीस पथकाने छापा टाकला. त्यावेळी काही इसम जेसीबी, ट्रॅक्टरच्या साहायाने वाळू उपसा करून नदीपात्राजवळ वाळूचा डेपो करीत होते. सदर ठिकाणी अंदाजे 5 ब्रास वाळूचा डेपो तयार केला असलेचे निदर्शनास आले. सदर वाळू डेपोवरती महसुल विभागामार्फत कारवाई करणेची तजवीज ठेवली व त्यावेळी सदर इसमानां नमुद जेसीबी व वाळूने भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली सह ताब्यात घेतली. पुढील कार्यवाहीसाठी पोलीस ठाणे येथे हजर केले. सदर बाबत पुसेगांव पोलीस ठाण्यास गुरनं. 218/2021 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला असून 4 इसमांना ताब्यात घेवून एक जेसीबी, व वाळूने भरलेले दोन ट्रॅक्टर ट्रॉली असा एकुण रूपये 26,14,000/- (रूपये सव्हीस लाख चौदा हजार) इतक्या किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सातारा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे यांनी दिले सुचनेप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांचे आदेशानुसार पो.उ.नि. गणेश वाघ, सफी तानाजी माने, पोहवा संतोष पवार, लक्ष्मण जगधने, साबीर मुल्ला, नितीन गोगावले, मंगेश महाडीक, पो.ना. अमोल माने, अमित सपकाळ, अर्जून शिरतोडे, स्वप्नील माने, शिवाजी भिसे, गणेश कापरे, पो.कॉ. स्वप्नील दौंड, प्रविण पवार, मोहसिन मोमीन, मयुर देशमुख व पुसेगांव पोलीस ठाणे कडील म.पो.हवा. पाटील व चालक पो.कॉ. डोंबे यांनी सदर कारवाईमध्ये सहभाग घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here