गलवान खोऱ्यातील वीर जवानांच्या शौर्यगाथेवर येणार सिनेमा; अजय देवगण करणार निर्मिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । १५ जूनच्या रात्री पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांमध्ये हिंसक संघर्ष झाला होता. या संघर्षांत भारतीय जवानांनी चीनच्या ४० जवानांना ठार केलं होतं. तर २० भारतीय जवान धारातीर्थी पडले होते. तर काही जवान जखमीही झाले होते. गलवान खोऱ्यातील भारतीय जवानांच्या साहस आणि बलिदानाची शौर्यगाथा आता मोठ्या पडद्यावर येणार आहे.

अभिनेता अजय देवगण या चित्रपटाची निर्मिती करणार असल्याची माहिती आज फिल्म क्रिटीक आणि ट्रेड अ‍ॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.“अजय देवगण गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीवर चित्रपट तयार करणार आहे. सध्या या चित्रपटाचं नाव ठरवण्यात आलं नाही. या चित्रपटात चीनच्या लष्कराच्या सामना केलेल्या त्या २० जवानांची शौर्यगाथा दाखवली जाणार आहे. या चित्रपटाची स्टारकास्टही अजून अंतिम करण्यात आलेली नाही,” असं ट्विट तरण आदर्श यांनी केलं आहे. अजय देवगण एएफ फिल्म्स आणि सिलेक्ट मीडिया होल्डिंग्स एलएलपी हे या चित्रपटाचे निर्माते असणार आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment