सांगली । सुशांत सिंह हा बेकार माणूस आहे, जर खोलात गेलं तर काही तर लफडेबाज जीवन असेल आणि त्यामुळे त्याने आत्महत्या केली असेल, याची लायकी काय आहे. दुर्दैव हे आहे की उगवता तरुण वर्ग हा नट आणि नट्यांच्या थिल्लर अत्यंत उथळ, टाकाऊ मार्गाचं आकर्षण घेऊन जगतोय हे या देशाचे दुर्दैव आहे, असं वक्तव्य शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केलं आहे. संभाजी भिडे यांनी पत्रकार परिषद घेतली. णि सुशांत सिंह राजपूत आत्महत्येबाबत भाष्य केलं.
“दुर्दैव असं आहे की समाजाने आदर्श समजले आहे ते सिनेमातील नट आणि नट्या, या नट नट्यांची त्यांची पात्रता काय? लायकी काय? त्यांची उंची काय? या नट नट्यांना आपल्या 1 अब्ज 35 कोटी जनतेचे मार्गदर्शन आणि दिशादर्शक म्हणून हा समाज स्वीकारतो म्हणजे या देशाचे लवकरात लवकर वाटोळे होणार आहे त्याचे ते निदर्शक आहे”, असं संभाजी भिडे म्हणाले. देशाला आदर्श असतील तर भगवान श्री कृष्ण, प्रभू रामचंद्र, छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आदर्श धरले पाहिजेत. सुशांत हा लायकीचा पण माणूस नाही, असं टीकास्त्र शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी सोडलं
सुशांत सिंह बद्दल बोलून आयुष्य वाया घालवणे हे सुद्धा चूक आहे. हे आपण करायला नको. सुशांत सिंह हा बेकार माणूस आहे, जर खोलात गेलं तर काही तर लफडेबाज जीवन असेल आणि त्यामुळे त्याने आत्महत्या केली असेल, याची लायकी काय आहे. दुर्दैव हे आहे की उगवता तरुण वर्ग हा नट आणि नट्यांच्या थिल्लर अत्यंत उथळ, टाकाऊ मार्गाचं आकर्षण घेऊन जगतोय हे या देशाचे दुर्दैव आहे, असं संभाजी भिडेंनी नमूद केलं.
.ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”