कोरोना लसीची सुई पाहून अंकिता लोखंडेची उडाली घाबरगुंडी; व्हिडीओ झाला प्रचंड व्हायरल

0
46
Ankita Lokhande
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। अभिनेत्री अंकिता लोखंडे सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते. तिच्या आयुष्यातील बऱ्याच घडामोडी ती आपल्या चाहत्यांसह शेअर करीत असते. कितीवेळा ती ट्रॉल होते तर कितीवेळा लोक तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करतात. या ना त्या कारणामुळे ती सतत सोशल मीडियावर चर्चेत असते. आता पुन्हा एकदा अंकिता लोखंडे चांगलीच चर्चेत आली आहे. कोरोना लसीचा पहिला डॉस घेतेवेळी इंजेक्शनची सूर पाहून अंकिताची चांगलीच घाबरगुंडी उडाली होती. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच वायरल होतोय.

https://www.instagram.com/p/COmYnYjlIJZ/?utm_source=ig_web_copy_link

खुद्द अंकिता लोखंडेनेच हा व्हिडीओ चाहत्यांसह शेअर केला आहे. नुसता व्हिडीओच नव्हे तर इतरांनाही लस घेण्यासाठी तिने आवाहन केले आहे. तिचा हा व्हिडीओ कोरोना लस घेतानाचा आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. लस घेताना अंकिता लोखंडे प्रचंड घाबरलेली दिसत आहे. नर्सही तिचे लक्ष दुसरीकडे जावे यासाठी काही सुचना देत असल्याचे पाहायला मिळते. इतक्यात अंकिता स्वामी समर्थांच्या नावाचा जप करायला सुरुवात करते. या सगळ्यात एकदाची लस घेवून मोकळी होते. लस घेतल्यानंतर मात्र अंकिताच्या जीवात जीव आला आणि ती हसायला लागते असे या व्हिडीओत पाहायला मिळत आहे.

https://www.instagram.com/p/COXmyCMr8Qr/?utm_source=ig_web_copy_link

अंकिताचा हा व्हिडीओ कोरोना लसीचा पहिला डॉस घेतेवेळचा आहे. लस घेण्यासाठी अंकितासोबत तिची आई देखील तिच्यासोबत तेथे उपस्थित होती. आईनेदेखील अंकिताला धीर दिला पण तरीही इंजेक्शनची सुई पाहून अंकिताची झालेली अवस्था या व्हिडीओत कैद झाली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर झाल्यानंतर अनेकांनी विविध समीक्षा दिल्या आहेत. इतकेच नव्हे तर हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात वायरल केला जात आहे.

https://www.instagram.com/p/CNttes5rBP_/?utm_source=ig_web_copy_link

सध्या तिच्या कामांपेक्षा खाजगी कारणांमुळेच ती जास्त चर्चेत असते. अंकिता लोखंडे आणि विकी जैन यांच्या रिलेशनशीपला नुकतेच तीन वर्षे पूर्ण झाले आहे. ते दोघे लवकरच लग्न करणार आहेत. अंकिता लोखंडेने पवित्र रिश्ता मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले होते. या मालिकेशिवाय अंकिता ‘मणिकर्णिका’ आणि ‘बागी ३’ मध्ये पहायला मिळाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here