कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा ; कंगणाने दिलं ओपन चॅलेंज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | बॉलिवूड अभिनेत्री कंगणा रणौतनं तिच्या रोखठोक आणि वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत असते.आता तर तीने चक्क मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरसोबत (POK) केल्यामुळे तिच्यावर सर्वच स्तरातून सोशल मीडियावर टीकेची झोड उठली आहे. त्यानंतर कंगनानं पुन्हा एकदा ओपन चॅलेंज करत ट्वीट केलं आहे.

‘मी मुंबईत येऊ नये अशी मला बरेच लोक धमकी देत आहेत. म्हणूनच मी येत्या आठवड्यात मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई विमानतळावर उतरण्याआधी मी मुंबईत येण्याची तारीखही कळवेन. कुणाच्या बापाची हिम्मत असेल तर रोखून दाखवा.’ असं कंगनानं धमकी देणाऱ्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

अभिनेत्री कंगणा रणौत हिनं देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरसोबत केली होती. कंगनाच्या या वक्तव्यामुळे तिच्यावर टीकेची झोड उठली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’