ड्रग्स प्रकरणी कंगणाचे गृहमंत्री अनिल देशमुखांना प्रत्युत्तर ; म्हणाली की….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई पोलिसांनी मादक आणि अमली पदार्थांच्या संबंधात अभिनेत्री कंगणा राणावत विरोधात चौकशी करत असल्याची चर्चा सुरू असताना कंगनाने  महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना प्रत्युत्तर दिले. कंगना म्हणाली की ती प्रत्येक तपासणीसाठी तयार आहे. त्यांचे कोणतेही दुवे बाहेर आल्यास ती कायमची मुंबई सोडून जायला तयार आहे.

महाराष्ट्र विधानसभेत आमदार सुनील प्रभू आणि प्रताप सरनायक यांनी ड्रग प्रकरणाची चौकशी करण्याबाबत भाष्य केले होते .त्यावर अनिल देशमुख म्हणाले की अध्ययन सुमनने एका मुलाखतीत सांगितले होते की, कंगना ड्रग्ज घेत असे आणि ती अध्ययन सुमनला ड्रग घेण्यास भाग पाडत होती. मुंबई पोलिस या प्रकरणाची सविस्तरपणे चौकशी करेल.

यावर कंगना म्हणाली- मुंबई पोलिस आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हे उपकार केल्याने मला फार आनंद होईल. कृपया माझी ड्रग चाचणी करा. माझा कॉल रेकॉर्ड तपासा जर माझा एखाद्या ड्रग पेडलरसोबत दुवा मिळाला तर मी माझी चूक स्वीकारून कायमस्वरुपी मुंबई सोडेन. तुम्हाला भेटण्याची वाट पहात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment