हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडची ज्वालामुखी अर्थात अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच तिच्या वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत येत असते. मात्र यावेळी कंगना चक्क हॉर्स रायडींग करताना दिसली आणि सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली. कंगना रनौतने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम सोशल मीडियावर एक व्हिडीओ आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कंगना अगदी मनसोक्तपणे हॉर्स रायडींग करताना आणि त्याचा आनंद घेताना दिसत आहे. खरंतर रविवारच्या सुट्टीचा आनंद म्हणून तिने बराचवेळ हॉर्स रायडींग केली. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिताना तिने याचे कारणदेखील स्पष्ट केले आहे.
https://www.instagram.com/p/CQDBaJCh5s3/?utm_source=ig_web_copy_link
जयललिता यांचा बायोपिक असलेल्या ‘थलायवी’ या चित्रपटासाठी अभिनेत्री कंगना रनौतने खूप मेहनत घेतली होती. जयललिता यांची भूमिका उठावदार आणि प्रेक्षकांना ओळखीची अशी दिसावी याकरिता कंगनाने खूप वजन वाढवले होते. मात्र आता कंगनाचा वजन कमी करण्याचा अतोनात प्रयत्न सुरू आहे. म्हणूनच बऱ्याच दिवसांनी घोडेस्वारी अर्थात हॉर्स रायडींग करायला गेले होते, असे कंगनाने म्हटले आहे. घोडा हा असा प्राणी आहे की त्याच्याबरोबर आपले ट्युनिंग जुळणे खूपच आनंददायी असते. तसे पाहता घोडा बोलू शकत नाही, मात्र त्याच्या वर्तनातून ते स्वाभाविकपणे लक्षात येते. मला याचाच खूप जास्त आनंद होतो, असे कंगनाने म्हटले आहे.
https://www.instagram.com/p/CN1sIUkBRhA/?utm_source=ig_web_copy_link
कंगनाने शेअर केलेल्या या हॉर्स रायडिंगच्या व्हिडीओवर तिच्या चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. शिवाय अनेकांनी या व्हिडिओवर खूप प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी तर कंगनाला काही तिखट आणि खोचट असे सवाल देखील केले आहेत. इतकी चांगली घोडेस्वारी करतेस, तर मग ‘मणिकर्णिका’मध्ये खोट्या घोड्यावर का बसली होतीस, असा प्रश्न अनेक जणांनी तिला विचारला आहे. इतकेच नव्हे तर एका युजरने असेही म्हटले आहे कि, ‘मणिकर्णिका’च्या अगोदर जर घोडेस्वारी शिकून घेतली असतीस तर चेष्टा तरी झाली नसती. यावरून एक लक्षात येते कि कंगनाने काहीही केले तरी ट्रोलिंगपासून तिची सुटका अशक्य आहे.




