नात्यास नाव आपुल्या…; विक्की कौशल सोबत असलेल्या नात्याला कॅटरिना जगजाहीर करणार..?, जाणून घ्या

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील आघाडीची अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल हे दोघेही त्यांच्या रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे सध्या खूपच चर्चेत आहेत. दोघांना बर्‍याचवेळा बऱ्याच ठिकाणी एकत्र पाहिले जाते. कधी हे दोघे एखाद्या इव्हेंटमध्ये एकत्र दिसतात, तर कधी एकमेकांच्या घरी एकमेकांना भेटायला जाताना. आतापर्यंत दोघेही रिलेशनशिपच्या बातम्यांवर प्रतिक्रिया देणे हमखास टाळायचे. तसे दरवेळी मुलाखतींमध्ये ते एकमेकांना मित्र म्हणून संबोधत असत. पण आता अशी बातमी येत आहे की, हे दोघेही त्यांचे जे काही अबोल नाते आहे ते सर्वांसमोर स्वीकारणार आहेत. कदाचित याबाबत लवकरच ते मीडियामध्ये कबुली देतील अशी शक्यता आहे.

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार कॅटरिना आणि विक्की एक कपल म्हणून आपले नाते जगजाहीर करण्यास आता सज्ज आहेत. लवकरच हे दोघेही सोशल मीडियावर पोस्ट करून याची घोषणा करतील अशी दाट शक्यता आहे. तसे विक्कीच्या वडिलांना विक्कीने असे पाऊल उचलावे, अशी अजिबात इच्छा नाही आहे. याबाबत त्यांनी आधीच विक्कीला कडक इशारा दिला आहे.रिपोर्टमध्ये असेही म्हटले आहे की, कॅटरिनाला विक्कीने को-स्टारसह इंटिमेट सीन करू नये असे वाटत आहे. विक्कीने यापूर्वी ‘मनमर्जिया’ आणि ‘लव्ह पर स्क्वेअर फीट’मध्ये लव्ह मेकिंग सीन्स दिले आहेत. मात्र कॅटरिनाला भविष्यकाळात विक्कीने असे सीन करू नयेत असे वाटते आहे.

अशी चर्चा आहे कि, नवीन वर्षात दोघांनी आपल्या भावा-बहिणीबरोबर नवीन वर्ष एकत्र साजरे केले होते. कारण, त्यावेळी कॅटरिनाने बहिणीसमवेत सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला होता. त्या फोटोमधील आरशामध्ये विक्कीची झलकदेखील दिसत होती. मुख्य म्हणजे हा फोटो वायरल झाल्यानंतर कॅटरिनाने तो लगेचच डिलीट केला होता. यानंतर ट्विटरवर कॅटरिनाचा एक फोटो व्हायरल झाला होता. या दरम्यान चाहत्यांनी असे म्हटले की, कॅटरिनाने विक्कीलाच मिठी मारली आहे. हा फोटो वायरल होत असतानाच ‘Vikkat’ असा हॅशटॅगही जोरदार ट्रेंडिंग होता.

यांच्या वर्क फ्रन्टबद्दल बोलायचे तर कॅटरिनाचा ‘सूर्यवंशी’ चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. या चित्रपटात ती अक्षय कुमारसोबत दिसणार आहे. शिवाय ती ‘फोन भूत’ आणि ‘टायगर ३’मध्येही दिसणार आहे. फोन भूतमध्ये कॅटरिना समवेत ईशान खट्टर आणि सिद्धांत चतुर्वेदी आहेत. तर ‘टायगर ३’मध्ये सलमान आणि कॅटरिना पुन्हा एकदा मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. विक्की कौशलच्या कामाबद्दल सांगायचे तर, तो ‘सरदार उद्यम सिंग’ या आगामी चित्रपटामध्ये दिसणार आहे. या व्यतिरिक्त तो माजी मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर सोबत एका चित्रपटात काम करत आहे. मात्र याचे नाव अद्याप निश्चित झालेले नाही.

You might also like