‘सच कहूं तो’ च्या माध्यमातून उलघडणार अभिनेत्री नीना गुप्तांचे आयुष्य

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दमदार अभिनय आणि बोल्ड स्टाईल स्टेटमेंटसाठी ओळखल्या जाणा-या बॉलिवूड अभिनेत्री नीना गुप्ता यांच्या चाहत्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे. अभिनेत्री नीना गुप्ता यांचे आत्मचरित्र लवकरच प्रकाशित होणार आहे. नीना यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर आत्मचरित्राच्या मुखपृष्ठाचा एक व्हिडीओ व फोटो शेअर केला आहे. ‘सच कहूं तो’ असे या आत्मचरित्राचे नाव आहे. पेंगुइन इंडिया हे आत्मचरित्र प्रकाशित करीत आहेत. या पुस्तकात नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधील दिवस, ८० च्या दशकात मुंबईत जाण्याचा निर्णय, लग्नाआधी आई होणे, बॉलिवूडमधील पदरी पडलेले राजकारण अशा अनेक गोष्टींवर त्यांनी भाष्य केले आहे. नीना गुप्तांचे हे आत्मचरित्र येत्या १४ जूनला प्रकाशित होणार आहे.

https://www.instagram.com/tv/CPH5dx6ibmJ/?utm_source=ig_web_copy_link

४ जुलै १९५९ रोजी नीना यांचा जन्म झाला. ‘खानदान’ या मालिकेतुन त्यांनी आपल्या करिअरला सुरूवात केली. यानंतर नजदीकिया, मंडी, उत्सव, डॅडी, तेरे संग, दिल से दिया वचन अशा अनेक चित्रपटांत त्यांनी विविध भूमिका साकारल्या. ८० च्या दशकात त्यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे त्या चांगल्याच चर्चेत आल्या. स्वतंत्र विचारांच्या नीना जगाची पर्वा न करता अनेक ठिकाण सामोरे जाऊनही आपल्या निर्णयावर ठाम राहिल्या. हा निर्णय होता, वेस्ट इंडियाचा माजी क्रिकेटपटू विवियन रिचर्ड्ससोबत लग्न न करता त्याच्या मुलीला जन्म देण्याचा. तसे पाहाल तर ८० च्या दशकात हा निर्णय नक्कीच क्रांतिकारी होता.

https://www.instagram.com/p/CPNBVhWs0-W/?utm_source=ig_web_copy_link

आज नीना यांनी साठी ओलांडली असली तरी स्वत:चे बोल्ड फोटो त्या सोशल मीडियावर शेअर करण्याचे धाडस ठेवतात. माझ्या बोल्ड फोटोवर हजारो कमेंट्स येतात. मी त्या एन्जॉय करते, असे त्या अलीकडे म्हणाल्या होत्या. माझ्या बंडखोरीने माझे करिअर उद्धवस्त केले, असे खुद्द नीना म्हणाल्या आहेत.

https://www.instagram.com/p/CMmEbT8M_Sp/?utm_source=ig_web_copy_link

एका मुलाखतीत त्या म्हणाल्या, इंडस्ट्रीत तुमची पर्सनॅलिटी पाहून तुम्हाला भूमिका दिल्या जातात. मी एक बंडखोर महिला होते. यामुळे मला सतत निगेटीव्ह भूमिका दिल्या. पहिल्या कमर्शिअल फिल्ममध्ये मी बबली गर्ल साकारली होती. यानंतर मला तसेच रोल ऑफर केले गेलेत. चोली के पीछे है क्या…या गाण्यानंतरही मला तशाच गाण्यांची ऑफर आली. पण टीव्हीने मला वाचवले. त्याकाळात टीव्हीचा आधार मिळाला नसता तर मला माघारी परतावे लागले असते, असे त्या म्हणाल्या होत्या.

Leave a Comment