हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | अखेर विधानपरिषदे साठी शिवसेनेकडून अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिलाला फोन करून आमदारकीची ऑफर दिली होती आणि उर्मिलानेही ही ऑफर स्वीकारली असल्याची माहिती सूत्रांकडून समजतेय.
उर्मिला मातोंडकरने सुशांतसिंह राजपूत प्रकरणात कंगना राणौतला जोरदार प्रत्युत्तर दिल्यानंतर उर्मिला पुन्हा एकदा चर्चेत आली होती. कंगनाचा सामना करण्यासाठी उर्मिलाला शिवसेनेने विधान परिषदसाठी आमदारकीची ऑफर दिली असल्याचं सांगण्यात येत आहे.
यापूर्वी उर्मिला मातोंडकरने मुंबई उत्तर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. मातोंडकर यांना भाजपच्या गोपाल शेट्टी यांनी हरवलं होतं. मात्र सहा महिन्यानंतर उर्मिला मातोंडकर यांनी ६ महिन्यानंतर काँग्रेसमधून अंतर्गत गटबाजीच्या कारणावरुन राजीनामा दिला होता.
खरंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी उर्मिला यांना विधान परिषद सदस्यत्वासाठी विचारणा केली होती मात्र त्यास त्यांनी नम्रपणे नकार दिला. हे कळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उर्मिला यांना फोन केला. राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून तुम्ही शिवसेनेच्या वतीने परिषदेवर जावे, अशी इच्छा मुख्यमंत्र्यांनी प्रदर्शित केली आणि त्याला उर्मिला यांनी होकारही दिला, असे सांगण्यात आले. यावर आघाडीतील मित्रपक्ष काँग्रेसचीही कोणतीच हरकत नाही. आता शिवसेनेने हा निर्णय अचानक का घेतला, हा कळीचा प्रश्न असून त्याला तशीच पार्श्वभूमीही आहे.
आर्टिकल ३७० हटवण्यावरुन उर्मिला मातोंडकरने केंद्र सरकारवरही सरळ निशाणा साधला होता. तेव्हा देखील उर्मिला मातोंडकर चर्चेत आली, कंगनाच्या तोडीस तोड उर्मिला मातोंडकरला आता शिवसेनेने आमदारकीची ऑफर दिली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’