सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचाच होणार- भरत पाटील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा : सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा भाजपचाच होणार असा दावा भाजपचे प्रदेश कार्यकारणीचे सचिव भरत पाटील यांनी केला आहे. सातारा जिल्ह्यात भाजपची ताकद वाढली असून नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्येही अत्यंत तळागाळातून काम करत आहेत त्यामुळे आगामी जिल्हा परिषदेत भाजपचाच बोलबाला पाहायला मिळेल असं भरत पाटील यांनी म्हंटल आहे.

“हॅलो महाराष्ट्र” शी बोलताना भरत पाटील म्हणाले, सातारा जिल्ह्यात आमचे अनेक आमदार आहेत. जावळी मतदारसंघात शिवेंद्रराजे भोसले, माण खटाव मध्ये जयकुमार गोरे हे भाजपचे आमदार आहेत, तर पाटण आणि कोरेगावात शिवसेनेचे आमदार आहेत, याशिवाय कराड दक्षिण मतदारसंघात अतुल भोसले आहेत त्यामुळे जिल्ह्यात आमची ताकद वाढली आहे. कराड नगरपरिषदेत भाजपचा अध्यक्ष आहे, सातारा नगरपालिकेत सुद्धा भाजपचा अध्यक्ष आहे, जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती, सहकारी संस्था भाजपकडे आहेत. साताऱ्यात भाजपचे संघटन मजबूत झाले असून आमचे कार्यकर्त्ये आणि पदाधिकारी पक्षासाठी मोठं योगदान देत आहेत असेही त्यांनी म्हंटल.

दरम्यान, राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारला सुद्धा कोणताही धोका नाही. सर्वोच्य न्यायालयाच्या निकालानंतर हे सरकार पडणार नाही. आणि यांच्यानंतर सुद्धा हेच सरकार पुन्हा एकदा सत्तेवर येणार आहे असं भरत पाटील यांनी म्हंटल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखाली राज्य सरकार गतिमान पद्धतीने कारभार करत आहे असं म्हणत राज्यातील आगामी सर्व निवडणूका भाजप आणि शिवसेना युतीतून लढवणार आहोत असेही त्यांनी स्पष्ट केलं.