अदानी समूह मुंबई विमानतळ सुद्धा विकत घेण्याच्या तयारीत?

0
54
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

विशेष प्रतिनिधी । भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर असणाऱ्या गौतम अदानी यांच्या अदानी समूहाने हवाई वाहतूक क्षेत्रामध्ये १८ हजार कोटींची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (एमआयएएल) कंपनीमध्ये सर्वाधिक हिस्सा आपल्या नावावर करण्यासाठी अदानी समूह १० हजार कोटी रुपये खर्च करण्यास तयार असल्याचे समजते. तर उर्वरित ८ हजार कोटींमध्ये अहमदाबाद, लखनौ, जयपूर, तिरुवनंतपुरम आणि मंगळुरूमधील विमानतळ विकसित करण्याचा अदानी समूहाचा विचार आहे.

फेब्रुवारी महिन्यामध्येच अदानी समूहाला सहा विमानतळांच्या देखभाल आणि हाताळणीचे ५० वर्षांचे कंत्राट मिळाले आहे. सध्या एमआयएएलचे १३.५ टक्के हिस्सेदारी विकत घेतली आहे. तसेच भविष्यात आपल्या मालकी वाढवण्यासाठी समूहाने १० हजार कोटींची तरतूद करुन ठेवली आहे. मात्र सध्या विमानतळाचा कारभार पाहणाऱ्या जीव्हीके कंपनीने अदानी समूहाच्या या हिस्सेदारीला विरोध करणारी याचिका कोर्टात दाखल केली आहे. मूळची दक्षिण आफ्रिकेची असणाऱ्या जीव्ही ग्रुपकडे सध्या एमआयएएलचे ५०.५० टक्के हिस्सेदारी आहे.

त्याशिवाय बिडवेस्टकडे १३.५ टक्के आणि एसीएसए ग्लोबल लिमीटेडकडे १० टक्के हिस्सेदारी आहे. मागील १३ वर्षांपासून या कंपन्या एकत्रितपणे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचा कारभार हाताळत आहेत. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयामध्ये अदानी समूह आणि जीव्हीके समूहामध्ये वाद सुरु आहे. बिडवेस्टला मुंबई विमानतळाची स्वत:च्या मालकिची हिस्सेदारी अदानी समूहाला विकायची इच्छा आहे तरी जीव्हीके त्यामध्ये अडथळे आणत असल्याचा आरोप अदानी समूहाने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here