Friday, June 9, 2023

कर्जत-जामखेडमध्ये निकालाआधीच रोहित पवार जनतेच्या ‘फोटोतील’ आमदार

अहमदनगर प्रतिनिधी | कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात झालेली लढत महाराष्ट्रातील सर्वात जास्त चुरशीची लढत मानली गेली. या मतदारसंघातून भाजपचे राम शिंदे यांच्या विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे रोहित पवार अशी दुरंगी लढत पहायला मिळाली. निवडणूकीच्या निकालासाठी काही तासांचा अवधी शिल्लक असताना कर्जत जामखेड तालुक्‍यात रोहित पवार प्रचंड मतांनी निवडून आल्याचे डिजिटल फलक उत्साही कार्यकर्त्यांनी लावले आहेत.

काही कार्यकर्त्यांनी थेट डिजे लावण्यासाठी इसार दिला आहे. या भागात सट्टा लावण्याचं प्रमाणही वाढलं असून कोट्यवधींमध्ये इथला सट्टाबाजार चालेल अशा शक्यता वर्तवण्यात येत आहेत. राम शिंदे यांच्या मागील १० वर्षांतील कामगिरीवर नाराज असणाऱ्या नागरिकांनी मतपेटीतून आपला हिसका विद्यमान पालकमंत्री राम शिंदे यांना दाखवल्याची चर्चा मतदारसंघात आहे.