गुजरातमधील ऊर्जा प्रकल्पांत अदानी समूहाची 6 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक; हा असेल मास्टर प्लॅन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या गौतम अदानी यांनी सिमेंट क्षेत्रामध्ये गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. कारण की, आता अंबुजा सिमेंट कंपनी अक्षय ऊर्जा प्रकल्पांमध्ये 6,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. याबाबतची माहिती कंपनीने सोमवारी दिली आहे. गुजरात आणि राजस्थानमधील सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांद्वारे 1,000 मेगावॅट क्षमता गाठण्याच्या दृष्टीने कंपनीने ही गुंतवणूक केली आहे. परंतु, अद्याप या कंपनीने एक्सचेंज फाइलिंगमध्ये निधी संदर्भात कोणतीही माहिती उघडकीस केलेली नाही.

गुजरात आणि राजस्थान मध्ये उभारल्या जाणाऱ्या सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्पांमुळे कंपनीची एकूण हरित ऊर्जा क्षमता सात टक्क्यांपेक्षा जास्त वाढणार आहे. खरे तर या गुंतवणुकी पूर्वीच अंबुजा सिमेंटने सांघी इंडस्ट्रीजमधील भागभांडवल 5,185 कोटी रुपयांना विकत घेतले होते. त्यावेळी, या ऊर्जा प्रकल्पांमुळे उत्पादन खर्च कमी होईल तसेच विजेचा खर्चही कमी होईल असा अंदाज कंपनीने व्यक्त केला होता. तसेच, विजेची किंमत 6.46 रुपये प्रति kWh वरून 5.16 रुपये प्रति kWh पर्यंत कमी होईल अशी माहिती कंपनीने दिले होती.

दरम्यान, अदानी समूहाने गेल्या काही काळापूर्वीच ग्रीन एनर्जीमध्ये 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याची मोठी घोषणा केली होती. कंपनीने म्हटले होते की, अदानी ग्रीन एनर्जी, अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी पोर्ट्स आणि अंबुजा सिमेंटचे 2025 पर्यंत शून्य कार्बन उत्सर्जन साध्य करण्याचे मानस आहे. त्यानंतर आता अदानी कंपनीने 6,000 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.