हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Adani Group) गेल्या काही काळात इ कॉमर्स आणि डिजिटल पेमेंटच्या दुनियेत मोठी उलाढाल पहायला मिळाली. जो तो बँकेत जाऊन किंवा ATM चा वापर करून पैसे काढणे टाळू लागला आहे. स्कॅन करा आणि पे करा अशी सोयीस्कर सिस्टीम सुरु झाली आहे. तसेच शॉपिंगसाठी बाजारात जाण्यापेक्षा ऑनलाईन साईटवरून शॉपिंग करणे सगळ्यांना जास्त सोयीचे वाटू लागले आहे. त्यामुळे फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, पेटीएम आणि गुगल पे यांसारख्या UPI कंपन्यांचं मार्केट वाढलं आहे. अशातच आता अदानी समूह इ कॉमर्स आणि डिजिटल पेमेंट सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. यामुळे साहजिक आहे इतर UPI कंपन्यांचे टेन्शन वाढले आहे.
अदानी ॲप पुरवणार ‘या’ सेवा (Adani Group)
एका वृत्तानुसार, अदानी ग्रुपला मान्यता मिळाली तर अदानी ॲपद्वारे बऱ्याच सुविधा प्रदान करण्यात येतील. अदानीचे ॲप २०२२ मध्ये लॉन्च झाले होते. सध्या या ॲपद्वारे तिकीट बुकिंग, हॉटेल बुकिंग यासह गॅस, वीज बिल भरण्याची सुविधा प्रदान केली जात आहे. (Adani Group) यानंतर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म आणि डिजिटल पेमेंटमध्ये प्रवेश केल्यानंतर, कंपनीचे प्रारंभिक लक्ष हे ग्राहकांच्या सुविधा असणार आहे. त्यामुळे या ॲपद्वारे ग्राहक विविध प्रकारचे पेमेंट्स करू शकतील. जे करताना त्यांना लॉयल्टी पॉइंट्स दिले जातील आणि याचा वापर ते ऑनलाइन शॉपिंगमध्ये करू शकतील.
कुणाशी असेल स्पर्धा?
अदानी ग्रुपने इ कॉमर्स आणि डिजिटल पेमेंट्सच्या सेगमेंटमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना बऱ्याच बड्या कंपन्यांसोबत स्पर्धा करावी लागणार आहे. ज्यामध्ये पेटीएम, फोनपे, गुगलपे अशा UPI आधारित पेमेंट ॲपचा समावेश आहे. (Adani Group) शिवाय इ कॉमर्सबद्दल बोलायचे झाले तर, फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, टाटा याना टक्कर द्यावी लागेल.