हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Added Sugar) आपण आपल्या दैनंदिन आहारात जे काही खातो ते अन्नपदार्थ आपल्या आरोग्यावर परिणाम करत असतात. आपल्या अन्नपदार्थांमध्ये प्रथिनं, पिष्टमय घटक, तंतूमय घटक आणि इतर पोषक घटक समाविष्ट असतात. त्याचप्रमाणे, साखरेचाही यात समावेश असतो. बऱ्याच लोकांना तिखट झणझणीत खायला आवडत. तर काही लोकांना प्रचंड गोड खायला आवडतं. तर काही लोकांना अजिबातच गोड आवडत नाही. असे असले तरीही, आपण जे अन्नपदार्थ खातो त्यामधून आपल्या शरीराला थोडथोडक्या प्रमाणात साखर मिळत असते.
त्यामुळे ज्यांना गोड आवडत नाही, त्यांच्या नकळत ते साखर खात असतात. जिला नॅचरल शुगर म्हणतात. दरम्यान, इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च अर्थात आयसीएमआरने एक महत्वाची माहिती दिली आहे. (Added Sugar) ज्यानुसार, दिवसातून २५ ग्रॅमहून अधिक ॲडेड साखरेचे सेवन करू नये किंवा आपल्या आहारातून साखर पूर्णपणे वर्ज्य करावी असे सूचित करण्यात आले आहे. असे का? ॲडेड साखर आणि नॅचरल साखरेत काय फरक असतो? याविषयी सविस्तर माहिती घेऊया.
आयसीएमआरची सूचना
ICMR च्या सूचनेनुसार, कोणत्याही व्यक्तीने दिवसभरात २५ ग्रॅमपेक्षा जास्त ॲडेड साखरेचे सेवन करू नये. कारण, ॲडेड साखरेच्या सेवनामूळे कॅलरी वगळता इतर कोणताही घटक शरीराला पुरवला जात नाही. (Added Sugar) परिणामी शरीराचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. ICMR कडून दर दिवशी Total Energy Intake पैकी केवळ ५% किंवा दर दिवशी २५ ग्रॅम साखरेचे सेवन हाय शुगर असे गृहीत धरले जाते. त्यामुळे आयसीएमआरने आरोग्याच्या दृष्टीने या महत्वाच्या सूचना दिल्या आहेत.
ॲडेड शुगरमुळे वाढतोय गंभीर आजारांचा धोका (Added Sugar)
आयसीएमआरच्या तज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, ज्या पदार्थांमध्ये मुळातच साखर असते अशा पदार्थांमध्ये वेगळी साखर जादा म्हणून मिसळल्यास त्याचा कॅलरी इंटेक वाढतो. परिणामी, अशा पदार्थांमधून आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारचे पोषक घटक मिळत नाहीत. म्हणजेच इथे कोणत्याही प्रकारे पोषक तत्वांचा पुरवठा केला जात नाही. त्यामुळे साखरेपासून दुरावा महत्वाचा मानला जातो. ॲडेड साखरेचे सेवन करणाऱ्यांमध्ये स्थुलता, मधुमेह, हृदयरोग, कॅन्सर आणि डिमेन्शिया यांसारख्या गंभीर आजारपणांचा धोका सर्वाधिक असतो, असेही तज्ञांनी सांगितले आहे.
ॲडेड शुगर आणि नॅचरल शुगरमधला फरक
ॲडेड शुगर म्हणजे काय? तर एखाद्या पदार्थावर प्रोसेसिंग करताना त्यामध्ये शुगर सिरप मिसळणे. अनेकदा बऱ्याच खाद्यपदार्थ आणि पेयांमध्ये अशी ॲडेड शुगर मिसळली जाते. यात सुक्रोज (टेबल शुगर), गूळ, मध, ग्लूकोज, फ्रुक्टोज, डेक्सट्रोजचा समावेश आहे. तर नॅचरल शुगर अर्थात नैसर्गिक साखर. (Added Sugar) जी मुळातच पदार्थांमध्ये असते. जसे की, एखादे फळ. फळातील ग्लुकोज किंवा फ्रुक्टोजसारखे घटक त्याचा गोडवा वाढवतात. हा गोडवा म्हणजेच नैसर्गिक साखर. अशा फळांचे सेवन करताना आणखी साखर घालून खाऊ नये, असे आहारतज्ज्ञ सांगतात.