‘महात्मा गांधींबद्दल वाईट बोलणारे रावणाची अवलाद!’- अधीर रंजन चौधरी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महात्मा गांधीबद्दल वाईट बोलत आहेत, ते रावणाची अवलाद आहेत, रामाच्या भक्ताचा ते अपमान करत आहेत. असा आरोप लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी माजी केंद्रीय मंत्री व भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांच्यावर केला आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशात दरम्यान मंगळवारी लोकसभेत माजी केंद्रीय मंत्री व भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी महात्मा गांधी यांच्या स्वातंत्र्य लढ्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून अधीर रंजन चौधरी भडकले.

या अगोदर देखील महात्मा गांधी यांच्याबद्दल हेगडे यांनी केलेल्या वक्तव्यावरून लोकसभेत काँग्रेससह अन्य विरोधीपक्षांकडून जोरदार विरोध करण्यात आला होता. बंगळूरु येथे शनिवारी एका जाहीर कार्यक्रमात बोलताना हेगडे यांनी,”संपूर्ण स्वातंत्र्य चळवळ ही ब्रिटिशांच्या मदतीने चालवण्यात आली होती. या चळवळीतील नेते म्हणवणाऱ्यांना एकदाही पोलिसांची लाठी खावी लागली नाही. त्यामुळे त्यांची स्वातंत्र्य चळवळ हे एक मोठं नाटकं होतं.” असंही त्यांनी म्हंटल होत.

ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.

 

Leave a Comment